आपला जिल्हासामाजिक

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या शिबीरात ६१ जणांचे उत्स्फूर्त रक्तदान

विविध उपक्रम राबविणार - महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघ

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज डिजिटल मिडिया

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

शहरातील महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघाच्या वतीने यावर्षी ही क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरी केली जाणार आहे. जयंतीच्या निमित्ताने गुरूवारी आयोजित शिबिरात ६१ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.

 

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येथील महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने अंबाजोगाईत आज ११ एप्रिल २०२५ रोजी १९७ वा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या जयंती उत्सवानिमित्त गुरूवार, दिनांक १० एप्रिल रोजी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शांतीनाथ बनसोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दिपक फुटाणे हे उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटनानंतर ६१ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. यावेळी शिबिर उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.के.मसने यांनी केले. तर उपस्थितांचे आभार राम घोडके यांनी मानले. महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघाच्या माध्यमातून यावर्षी ही क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अभिवादन, रक्तदान शिबीर, अभिवादन रॅली, वृक्ष वाटप आणि प्रबोधनपर व्याख्यान आदी विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिर प्रसंगी प्रकाश बलुतकर, विष्णु राऊत, अंकुश घोडके, राम जिरे, संतोष राऊत, अनंत मसने, डॉ.दत्तात्रय मसने, भागवत मसने, गणेश जाधव,‌ करपुडे सर, ज्ञानेश्वर जिरे, बालासाहेब माळी, मधुकर घोडके, बंडू मसने, रमेश जिरे, बलुतकर सर, मिलिंद बाबजे, पंकज राऊत, नितीन जिरे, मंगेश बलुतकर, राहुल माळी, अभय जिरे, निवृत्ती जिरे, संदेश डाके, शरद माळी, भारत घोडके, श्रीकृष्ण घोडके, बळीराम धनवडे, आकाश चोपने, गजानन घोडके, प्रविण चोपने, योगेश कातळे, अक्षय घोडके, बालाजी घोडके, बालाजी जिरे, दिपक आरसुडे, ऋषि मसने, कृष्णा मसने, नवनाथ माळी, अनिकेत घोडके, पवन घोडके, अनुज घोडके, विशाल, महेश, अक्षय चोपने, पवन जिरे, दामोदर माळी, भागवत जिरे, किरण भालेकर, सुधीर माळी, रोहन माळी, बाळु फुलझळके, दत्तात्रय बनसोडे, शाहीर तुकाराम, प्रविण जोगदंड, राहुल जिरे, अतुल राऊत, सतिश राऊत, शिवराज राऊत, संदीपान देशमाने, गोविंद पाथरकर, ऋषि पाथरकर, किरण पाथरकर, नंदकुमार बलुतकर, सुमीत सुनील राऊत, प्रदीप चोपणे, गोविंद पाथरकर, सुजीत बोते, अमोल जिरे, भागवत जिरे, दिनेश घोडके, विजय जिरे, महेश घोडके, सागर साखरे, प्रशांत राजमाने, प्रकाश चोपणे, सुरज राऊत, सुशील शिंदे, दयानंद दगडू राऊत, प्रज्ज्वल राऊत, उद्भव जिरे, उदय घोडके, बाळासाहेब जिरे, सुधीर डोके, गणेश डाके, पप्पू जिरे आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती. रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.