ढेकणमोहा येथे रक्तदान व हृदयरोग तपासणीस नागरिकांचा प्रतिसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व नागेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड (प्रतिनिधी)
मातोश्री रमाबाई आंबेडकर सेवाभावी संस्था, ढेकणमोहा यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व मा. नागेश दादा शिंदे (माजी सरपंच) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर तसेच हृदयरोग व आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या थाटात संपन्न झाले. या शिबिरासाठी मा. श्री. डॉ. संजय राऊत (जिल्हा शल्य चिकित्सक बीड), यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील शिबिर खेडकर हॉस्पिटल, परळी रोड, ढेकणमोहा, ता. जि. बीड येथे दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. डॉ. संजय राऊत (जिल्हा शल्यचिकित्सक, बीड), मा. डॉ. बोबडे मॅडम (हृदयरोग तज् बीड), मा. श्री. शाहूराव डोळस (जिल्हाप्रमुख, रिपाई दिव्यांग आघाडी बीड), श्री. अरुण नाना डाके (मा. कृषी उत्पन्न बाजार समिती बीड) मा. श्री. गंगाधर घुमरे (मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष बीड), श्रीमती मायाताई मिसळे (जिल्हाप्रमुख, रिपाई बीड), मा. डॉ. भाऊसाहेब खेडकर (खेडकर हॉस्पिटल, ढेकणमोहा), ॲड. राजेंद्र राऊत (मा. जि.प. सदस्य, नाळवंडी), मा. श्रीमती संगीता वाघमारे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीड), मा. श्री. किसन तांगडे (तालुकाध्यक्ष, रिपाई बीड), सुभाष तांगडे (युवक अध्यक्ष रिपाई बीड) चंदकांत फड (जिल्हा कोषाध्यक्ष भाजपा बीड), ग्रामसेवक बाबुराव तांदळे, होंडरे भारत, डॉ. वनिता माटे gnm, तपसे मॅडम mpw, गव्हाणे शिवाजी, भगवान पवार जिल्हा अध्यक्ष शिक्षक संघटना बीड, सुनंदा उगलमुगले, भास्कर देवकते आदि यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमासाठी नारायण देवकते (ग्रामपंचायत सदस्य तथा चेअरमन) भगवान देवकते, हनुमान देवकते, रमेश देवकते, पत्रकार सतीश वाघमारे, (परमेश्वर थापडे उपसरपंच ढेकणमोह), शरद देवकते (ग्रामपंचायत सदस्य), सतीश शिनगारे, शामराव जाजु, संतोष जाधव, हरिभाऊ दराडे, दीपक तांगडे, भाऊसाहेब कांबळे,शेख चांदभाई बाबुराव भालेराव, राहुल कांबळे, राहुल कोरडे, दयाराज शिंदे, कुमार जाधव, गणेश काळे, संजय राऊत (चेअरमन), भैय्या हरणावळ, राहुल शिंदे, विनोद शिंदे, बापू शिंदे, अविनाश शिंदे, आदि यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नागेश शिंदे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या संचालन पत्रकार विनोद शिंदे यांनी केले. तसेच रक्तदान शिबिर व हृदयरोग तपासणीसाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.