मोहंमद पैगंबर यांचा जन्म दिन– (ईद ए मिलाद)

अंबाजोगाई /प्रतिनिधी
ईद ए मिलाद किंवा ईद ए मिलादून्नबी मोहंमद यांचा जन्म दिवस इ.स.571 साली 23 एप्रिल रोजी यांचा जन्म अरबस्थानात झाला.पृथ्वीवरील अन्याय ,अत्याचार यांचा नायनाट करण्यासाठीच अल्लाहने (ईश्वराने) या सदपुरुषाचा जन्म घातला.या काळात यांचा सांभाळ व स्वतःचे दूध पाजण्याचे काम हालीमा नावाच्या दाईने केले.
इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर नाहीत तर त्यांच्या जन्माच्या 2500 वर्षापूर्वी जन्माला आला .इस्लाम धर्मात मोहंमद पैगंबाराच्या पूर्वी एक लाख चोवीस हजार पैगंबरांनी जन्म घेतला ज्यात मुसा आलै सलाम व नूहु आलै सलाम या पैगंबरांचा जन्म झाला.पैगंबरांचे पैगंबर म्हणून मोहंमद पैगंबर समजले जातात.पैगंबर म्हणजे थोडक्यात संत.
इस्लाम धर्मात चार धर्मग्रंथ अवतरले.जबूर ,तौरात , इंजील आणि शेवटचा कुरआन.कुरआन हा शेवटचा ग्रंथ मोहंमद पैगंबरावरती अवतरला .याचे कारण पहिल्या तीन ग्रंथात फेरबदल (मानवाकडून) करण्यात आले.कुरआन हा ईश्वरी ग्रंथ असून यात कोणालाही फेरबदल करता येत नाही.आणि म्हणून कुरानमध्ये जे सांगितले (अल्लाहाने ) त्याप्रमाणे मुस्लिम चालतात.मोहंमद पैगंबराना पहिली वही (आदेश) गारे हिरा (अरबस्थानात गुफाचे )नाव येथे आल्लाहा च्या ध्यान धारनेत असतानाच आली .मोहंमद पैगंबरानी ईश्वराला सांगितले की मला वाचता येत नाही पण माझे नाव घेऊन वाचा .तो अरबी भाषेतील शब्द आहे ‘इकरा’ मोहंमद पैगंबरानी नाव घेऊन वाचले आणि कुरानचे आलेले आदेश वाचू लागले.मुस्लिम मध्ये शिक्षण हे ईश्वराकडूनच पंधराशे वर्षापासून प्रारंभ झाले.सर्व मुस्लिमांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे.इकरा म्हणजे शिका/ वाचा.
मोहंमद पैगंबराचे व
आई व वडलांचे छत्र लवकरच संपले.बालपणी दाई ‘हालीमा’ नंतर त्यांचा सांभाळ आजोबांनी (वडीलाकडच्या) केला.धर्म प्रचार प्रसार करण्यासाठी मोहंमद पैगंबराना स्वकीयाकडून खूप त्रास झाला. हा त्रास त्यांना मक्का मदिनेतील त्यांच्याच नातेवाईकांकडून व इतरांकडून झाला .शेवटी मक्केतील लोकांनी तुम्ही जे करता ते सोडून द्या.पण ईश्वराच्या आदेशाने मी माझे धार्मिक काम करतो म्हणून त्यांनी ते सोडण्यास नकार दिला.शेवटी नाईलाजास्तव मक्का शहर सोडून ते मदिना शहरात गेले व तेथे त्यांना त्यांच्या कामत यश आले.पण धर्मासाठी मादीनेत काम करत असताना मोहंमद पैगंबराना लढाया कराव्या लागल्या.पण अल्लाह ने त्यांना त्या लढायात यशस्वी केले.कुरैश विरुद्ध मुसलमानांच्या बदर (अरबस्थानातील एक ठिकाण) येथील लढाईत मुसलमान 300 तर कुरैश 1000 च्या संख्येने होते तरी मोहंमद पैगंबराना अल्लाह ने शक्ती दिलीव मोहम्मद पैगंबर यशस्वी झाले.
मोहंमद पैगंबराना चार मुली होत्या .जैनप , रुकैय्या, कुलसुम आणि फातेमा .फातेमावर मोहंमद पैगंबरांची खूप माया होती.एका सणात फतेमाच्या घरात तिच्या हसन ,हुसेन,मुलांना आपल्या गरिबीमुळे कपडे घेतले नव्हते.घरात गोड धोड केले गेले नाही.पैगंबर आले आणि अल्लाहला म्हणजेच ईश्वराला मागितले तर खूप धन घरात आले पण फतेमाला मुलीला सांगितले आपणास गरजेपुरतेच घ्यायचे आहे. हे सर्व समाजातील संपत्ती गोळा करणाऱ्यानी शिकण्यासारखे आहे. मोहंमद पैगंबराना कासीम, अब्दुल्ला ,इब्राहिम,ही मुले होती.पण मोहंमद पैगंबरांच्या हायातीत कोनीही राहिले नाही.
इस्लाममध्ये महिलांना जसा हिजाब आहे तसा पुरुषही पर स्त्रीला पाहू शकत नाही .हिजाब वापरून त्याकाळी जैनप महिलेने करबला(इराकमधील स्थान )लढाईचे नेतृत्व केले होते.इस्लाम कुरआन व हादिस या दोन गोष्टीच्या पायावर चालते.मोहंमद पैगंबरांनी ज्या धार्मिक गोष्टी(नैतिकतेच्या)चालतात त्या हुकुमावर चालतात ,कसे खावे ,बोलावे कसे,शेजाऱ्यांशी वागावे कसे , जकात किती द्यावी ,जकात कोणी द्यावी , जकात कोणाला द्यावी वैगरे अनेक गोष्टी पैगंबरानी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिल्या आहेत.दारू पिऊ नये, व्याज घेऊ नये,म्हणून आदेश दिले.अल्लाहने पृथ्वी तलावरील मोहंमद पैगंबराचे धार्मिक संपल्यानंतर जिब्राईल (एक नाव)दूताकरवी विचारणा केली की आता आपल्याला स्वर्गात यायचे काय? तेव्हा मोहंमद पैगंबरांनी दुताला सांगितले माझ्या मुस्लिम लोकांचे काय? तेव्हा मोहंमद पैगंबरांचे म्हणणे मान्य केले .मोहंमद पैगंबरानी शेवटचा संदेश दिला. तो हा की मुस्लिमांनो तुम्ही नमाज व कुरआन सोडू नका.तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल.मुस्लिमांचा जन्म येथे केवळ महती सांगण्यासाठी ,कुरआन मधील गोष्टी संगण्यासाठीच झालेला आहे, या ठिकाणी संपत्ती कमावण्यासाठी नाही.
आज मक्का या शहराचे अल्लाहचे घर आणि मदीना येथील मोहंमद पैगंबराचे समाधी स्थळ अतिशय स्वच्छ आहेत.हज यात्रेला 60 लाख लोक येऊनही जबरदस्त सोय केलेली आहे.मदिनेला तर अल्लाहचा पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटले जाते.अल्लाहने आज पैगंबराच्या वंशातील एकही व्यक्ती /नातलग जिवंत ठेवले नाही.त्यांच्याच वंशातील लोकांची पूजा करू नये.असाही अल्लाहचा विचार असेल.वयाच्या 63 व्या वर्षी मोहंमद पैगंबरला अल्लाहने बोलावून घेतले .या थोर महात्म्यास लाख लाख सलाम..
सय्यद पाशू सर अंबाजोगाई.