विशेष सोहळ्यात ‘सह्याद्री भुषण पुरस्कार – २०२५’ चे मान्यवरांच्या हस्ते वितरण
महाराष्ट्रातील पत्रकारांची हक्काची संघटना असलेल्या सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या प्रथम वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज (प्रतिनिधी)
सह्याद्री मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त केज शहरात सोमवार, दिनांक ५ मे रोजी ‘सह्याद्री भुषण पुरस्कार-२०२५’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी केज तालुक्यातील जेष्ठ नेतृत्व व ज्यांनी आजपावेतो आपल्या कारकीर्दीत विविध समाजोपयोगी पदे भुषविली असे ज्येष्ठ मार्गदर्शक ऍड.राजेसाहेब (पापा) देशमुख आसरडोहकर यांना सह्याद्री भुषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर नाव्होली येथील भुमिपुत्र सी.ए.इनामदार (माजी नायब तहसीलदार) तथा कृषी व सामाजिक प्रश्नांवर आपला संघर्ष अविरत सुरू ठेवणारे यांना कृषी व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सह्याद्री भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले व केजच्या मातृभूमीत अक्षर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक कार्यात सतत अग्रभागी असलेल्या संस्थेस उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष विष्णू यादव, सचिव विक्रम डोईफोडे, संचालक महादेव ढाकणे, संचालक तथा शिक्षक सहकारी पतसंस्था केजचे कोषाध्यक्ष किशोर भालेराव, उपाध्यक्ष युवराज हिरवे, सदस्य राहुल काकनाळे, राहुल उंडाळे यांच्या संस्थेस सामाजिक शैक्षणिक सह्याद्री भुषण पुरस्कार तर केज तालुक्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यासाठी व केज तालुक्याचे नांव पटलावर आणण्यासाठी अविरत कार्य करणारे केज तालुका क्रीडा संयोजक प्रा.विनोद गुंड यांना क्रीडा क्षेत्रासाठी सह्याद्री भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व केज बसस्थानक येथे मागील अनेक वर्षांपासून अविरत क्रांती न्युजपेपर एजन्सी, केजच्या माध्यमातून वर्तमानपत्र वितरण सेवेतील कार्याबद्दल दिलीप गवळी यांना सह्याद्री भुषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सदरील वितरण समारंभ जेष्ठ मार्गदर्शक ऍड.राजेसाहेब (पापा) देशमुख आसरडोहकर यांच्या शुभहस्ते व सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद (नाना) शिनगारे, प्रदेशाध्यक्ष डॉ.जावेद शेख, प्रदेश कार्याध्यक्ष शहाजी भोसले यांच्या विशेष उपस्थितीत मान्यवरांना सह्याद्री भुषण पुरस्कार-२०२५ प्रदान करण्यात आले.
यावेळी सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे केज तालुकाध्यक्ष अनिल ठोंबरे यांना वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वांच्या वतीने सह्याद्री भुषण सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संघाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त सर्व पत्रकार पदाधिकारी यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना भरभरून शुभेच्छा देत संघाच्या कामगिरीचे कौतुक केले व येणाऱ्या काळात कोणत्याही मदतीसाठी आम्हाला हाक द्या असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले यावेळी सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे सुमंत कदम, पुणे जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, पुणे जिल्हा सचिव इंजि.दत्ता शिनगारे, बीड जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, बीड जिल्हा सचिव अर्शद सय्यद, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष प्रा.दत्ता जाधव, आष्टी तालुकाध्यक्ष मेजर विकास म्हस्के, अंबाजोगाई तालुका सचिव गोविंद लांडगे, युवक कार्यकर्ते युवराज मगर यांची विशेष उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्य आयोजक सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल ठोंबरे, सचिव डॉ.लतिफ शेख, कार्याध्यक्ष महादेव दौंड, उपाध्यक्ष दत्तात्रय भाकरे, सदस्य अर्शद शेख, बीड तालुका उपाध्यक्ष दिलीप बेलवडकर, सदस्य अनिल कांबळे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद (नाना) शिनगारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ.जावेद शेख यांनी मानले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्विरित्या संपन्न झाला.