कारगिल युद्धातील अनुभव ऐकून उपस्थित गहिवरले
जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेने केले कारगिल युद्धातील शहिदांना अभिवादन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेने २६ व्या कारगिल विजय दिवस निमित्त शहिद भारतीय जवानांना अभिवादन केले. संस्था परिसरात युद्ध स्मारक स्तंभावर संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप यांच्या हस्ते रित परेड करण्यात आला. या परेडनंतर कारगिल युद्धामध्ये शहिद झालेल्या वीर सैनिकांना त्यांच्या अतुलनिय कार्याच्या स्मृती जागवत आदरांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप, सचिव माजी सुभेदार आबासाहेब हाके, कोषाध्यक्ष बाबासाहेब केंद्रे, संचालक भरत पांचाळ, संचालक अरविंद तपसे, संचालक ज्ञानेश्वर कदम, संचालक सिंधुताई निर्मळ, सभासद दिलीप निकम, सर्व सन्माननिय सभासद श्री अंकुश काळे, गोपीनाथ काळे, राधाकिशन कुंडगर, शिवाजी गंगणे, पांडुरंग गावडे, यशवंत व्हावळे, संभाजी वाघमारे यांच्यासह यांच्यासह संस्था वसाहती मधील पुरूष व महिला भगिनी यांनी उपस्थित राहून कारगिल विजय दिवस साजरा केला. या प्रसंगी कारगिल युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या योध्यांनी कारगिल युद्धातील आपले अनुभव कथन केले. विविध प्रसंग उभे केले. आपल्या अनुभवातून त्यांनी उपस्थितांना कारगिल युद्धातील विविध प्रसंग सांगितले. या प्रसंगी उपस्थित महिला, पुरूष यांचे डोळे भरून आले, मन गहिवरले, प्रारंभी संस्थेचे सचिव व कारगिल युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले माजी सुभेदार आबासाहेब रंगनाथ हाके यांनी कारगिल युद्धाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. तर संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग शेप यांनी कारगिल युद्ध का, कसे व कोणत्या कारणामुळे घडले. हे सांगून कठीण परिस्थितीत भारतीय सैन्याने आपले मनोधैर्य न खचू देता शत्रुशी दोन हात केले., प्रखर लढा दिला व शौर्याचे धाडस दाखवून विजय संपादन केला. ही गाथा म्हणजे कारगिल विजय दिवस होय. या युद्धात शौर्य गाजविणाऱ्या सर्व भारतीय सैनिकांना अभिवादन करीत असल्याचे कॅप्टन पांडुरंग शेप यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार संस्थेच्या वतीने मानण्यात आले.