युनिटी ऑफ मूलनिवासी समाज यांच्या वतीने अंबाजोगाईत २ ऑगस्ट रोजी विशेष जिल्हा सम्मेलनचे आयोजन
विविध विषयांवर मौलिक चिंतन ; उपस्थित रहाण्याचे आवाहन
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
युनिटी ऑफ मूलनिवासी समाज यांच्या वतीने अंबाजोगाईत शनिवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी विशेष जिल्हा सम्मेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या सम्मेलनात विविध विषयांवर मौलिक चिंतन, चर्चा होणार आहे. तरी या सम्मेलनात बीड जिल्ह्यातील मूलनिवासी समाजाने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन गोविंद सोन्नर (राज्य महासचिव, युनिटी ऑफ मूलनिवासी समाज, महाराष्ट्र) यांनी केले आहे.
युनिटी ऑफ मूलनिवासी समाज, बीड यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राजमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष, जोशी वतन बिल, आरक्षण दिन, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशनच्या तयारी अंतर्गत – अंबाजोगाई शहरात शनिवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी वेळ : सायंकाळी ६ ते ९.३० वाजेपर्यंत पत्रकार भवन, नगरपरिषद, अंबाजोगाई (जि.बीड.) या ठिकाणी विशेष जिल्हा सम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. सम्मेलनाचे उद्घाटक म्हणून ऍड.किशोर गिरवलकर (ओबीसी आंदोलनाचे वरिष्ठ मार्गदर्शक) तर अध्यक्षस्थानी कमलाकांत काळे (राष्ट्रीय अध्यक्ष, युनिटी ऑफ मूलनिवासी समाज) हे असणार आहेत. यावेळी अखिल खतीब (जमियत-ए-उलेमा मराठवाडा संघटक), रामकिसन मस्के (ज्येष्ठ मार्गदर्शक, मराठा सेवा संघ, बीड), इंजि.प्रभाकर कांबळे (आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक), भगवान गडदे (अध्यक्ष, स्वामी विवेकानंद पतसंस्था, अंबाजोगाई.), डॉ.योगेश सुरवसे (ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट, अंबाजोगाई), रवी वत्सला वामन आडे (प्रसिद्धीप्रमुख, गोर सेना), मधुकर सुरवसे (तालुकाध्यक्ष, नाभिक महामंडळ, अंबाजोगाई.), बिबिषण चाटे (वंचित बहुजन युवा, जिल्हा महासचिव, बीड.), नवनाथ चौरे (अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समिती, अंबाजोगाई), अमोल काळे (ज्येष्ठ शिक्षक, गेवराई), लक्ष्मण वैराळ (बहुजन आंदोलन अभ्यासक, परळी) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी पुढील विषयांवर मौलिक चिंतन आणि चर्चा होणार आहे. विषय – १) जाती जनगणना, एनपीआर आणि अनुसूचित जाती – जनजाती आरक्षणातील उपवर्गीकरण शासक वर्गाची भूमिका – एक गंभीर विश्लेषण, २) एनपीआर हीच खरी एनआरसी !, आणि ३) स्वर्णिम भारताच्या पुनर्निर्मितीमध्ये विद्यार्थी, युवा, महिला आणि बुद्धिजीवी वर्गाची भूमिका अर्थात मूलनिवासी बहुजन समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक ध्रुवीकरणा शिवाय ब्राह्मणी धार्मिक ध्रुवीकरणाचा मुकाबला करता येणार नाही. असे विषय आहेत. तरी बीड जिल्ह्यातील मूलनिवासी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर, विद्यार्थी, युवा, महिला आणि बुद्धिजीवी वर्गाने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन निवेदक : युनिटी ऑफ मूलनिवासी समाज, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.