पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल गदळे यांच्यातर्फे महाआरती,वृक्षारोपण ,शालेय
विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,फळवाटप करून उत्साहात केला साजरा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज /प्रतिनिधी
महाराष्ट्राची रणरागिणी तथा पर्यावरण मंत्री पंकजा ताईं यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नमिता ताई मुंदडा, भाजप चे जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा,अक्षय भैय्या मुंदडा, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल गदळे यांनी दहिफळ वडमाऊली येथे सर्व प्रथम वडमाऊली देवीची आरती करून ,मंदिर परिसर स्वच्छता, वृक्षारोपण कार्यक्रम, शालेय विध्यार्थ्यांना शालेय साहित्य,फळे वाटप करून तसेच जिल्हा परिषद शाळेला शालेय साहित्य देऊन मोठ्या उत्साहात पार पडला.
वृक्षारोपण व शालेय विध्यार्थ्यांना शालेय साहित्य ,फळ वाटप, जिल्हा परिषद शाळेसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष सखाहारी तात्या गदळे यांनी पंकजाताईच्या कार्याविषयी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्या नंतर दहिफळ वडमाऊली चे सरपंच डॉ.शशिकांत दहिफळकर यांनी पंकजाताई चे कार्य खूप मोठे आहे त्यांच्या कार्याविषयी जर बोलायचे झाले तर पूर्णदिवस पुरणार नाही असे म्हटले व मंत्री पंकजाताईनां वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तसेच पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिफळ वडमाऊली येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अंगणवाडी च्या आवारात ,ग्रामपंचायत व प्रथमिक उपकेंद्रच्या समोर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. यावेळी, पंकजाताईंच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
वृक्षारोपण करून, पंकजाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. या उपक्रमातून, दहीफळ येथे हरित महाराष्ट्र संकल्पनेला बळ मिळाले आहे.
यानिमित्ताने विविध ठिकाणी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी झाडे लावून पंकजाताईना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी इंजिनियर शरद बप्पा गदळे, जयदत्त दहिफळकर,बाळासाहेब ठोंबरे, संतोष मुंडे,विजय ठोंबरे, बंकट ठोंबरे, अमोल ठोंबरे, धंनजय मोराळे,आण्णा ठोंबरे, बाळू ठोंबरे,सूर्या गदळे,विजय गदळे,विकी गदळे, पिनू ठोंबरे,संदीप ठोंबरे, गणेश ठोंबरे,श्रीनिवास मुंडे,पप्पू ठोंबरे, मच्छिन्द्र ठोंबरे, विनोद गदळे,विनोद मोरे, मल्हारी गदळे जिल्हा परिषद मुख्याध्यापक मुंडे सर , खोसे सर ,अनिल ठोंबरे सर , गावातील युवा वर्ग ,प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
या कार्यकर्माचे सूत्रसंचालन खोसे सर यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर यांनी मानले.
चौकट
पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे.एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मिळु शकेल. आक्सीजन मोठ्या प्रमाणात मिळेल. वृक्षारोपण वृक्षसंवर्धन “एक वृक्ष आरोग्य स्वस्थ” चला आज पासून संकल्प करुया एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया – राहुल गदळे (भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, केज)