समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर पुरोहित कल्याण समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी अनंत देवा कोकीळ यांची निवड

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज/प्रतिनिधी
समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी केलेले आंदोलने व सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती संघटनात्मक बांधणी करत असून संस्थापक अध्यक्ष श्री.धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तसेच समस्त समाज संघर्ष समिती अंतर्गत ब्राह्मण समाज पुरोहित कल्याण समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी वेद शास्त्र संपन्न श्री.अनंत देवा संजीवनराव कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली तसे नियुक्ती पत्र ब्राह्मण समाज पुरोहित कल्याण समिती चे प्रदेशाध्यक्ष श्रीनिवास केजकर यांनी दिले. समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे वेळोवेळी निवेदने,वेगवेगळे आंदोलने करण्यात आली याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सोबत तीन वेळा बैठका झाल्या. तसेच वेगवेगळी आंदोलने करण्यात आली.यामध्ये धरणे आंदोलन आझाद मैदानावरील आंदोलन, मोटरसायकल रॅलीमोर्चा पळी ताम्हण वाजून केलेले आंदोलन, उपोषण आदी आंदोलने करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रभर याचीव्याप्ती झाली होती समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या सोबत ब्राह्मण समाजाच्या इतर संघटना ही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.संपूर्ण ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी नियमितपणे संघर्ष समिती कार्य करेल ब्राह्मण समाजाच्या उर्वरित मागण्या पुरोहितांना मानधन, ब्राह्मण संरक्षण कायदा प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह मंदिरावरील सरकारचे नियंत्रण काढणे,वेदपाठ शाळांना मानधन देणे, आदी उर्वरित मागण्या साठी ब्राह्मण समाज संघर्ष समिती कार्य करणार आहे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी करत आहे याचाच भाग म्हणून मराठवाडा अध्यक्षपदी चंद्रकांत पुरुषोत्तमराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तर ब्राह्मणसमाज पुरोहित कल्याण समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी अनंत देवा संजीवनराव कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी धनंजय कुलकर्णी, श्रीनिवास केजकर, शिवराज मुथळे,श्रीधर खोत,गजानन औसेकर उपस्थित होते.लवकरच संपूर्ण महाराष्ट्राची संघटनात्मक बांधणी पूर्ण होईल असाविश्वास धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.