दुष्काळग्रस्त बीडसाठी विशेष निधी अन् मंजूरी द्या
खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री खट्टर यांची भेट घेवून केली मागणी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड: बीड जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. पायाभूत सोयी-सुविधा पण कमी आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी आणि मंजुरी मिळावी, अशी मागणी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण तथा शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दि.१० रोजी खा.सोनवणे यांनी मुंबई येथे मंत्री खट्टर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
बीड जिल्ह्यात विविध विकास योजना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री खट्टर यांना दिलल्या निवेदनात म्हटले आहे, ग्रामीण भागात नवी वीज सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर गावागावात स्थिर वीजपुरवठा व्हावा म्हणून ही गरज आहे. शेतकऱ्यांना सौर पंप (पीएम-कुसुम योजना) शेतीसाठी पाणीपुरवठा सोपा होईल. शहरी भागात स्मार्ट मीटर व भूमिगत केबल वीज चोरी थांबेल आणि सुरक्षित वितरण होईल.सौर-पवन ऊर्जेचे प्रकल्प जिल्ह्याला हरित ऊर्जा उत्पादनाचं नवं केंद्र बनवता येईल. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) शहरातल्या गरीब व मध्यमवर्गीयांना परवडणारी घरं उपलब्ध होतील. अमृत २.० मिशन अंतर्गत पाणीपुरवठा, ड्रेनेज व स्वच्छता योजना झ्र स्वच्छ वातावरणामुळे आजारपण कमी होईल. बसस्थानक, रस्ते, उद्यानांचं आधुनिकीकरण प्रवास व दैनंदिन सोयीसुविधा सुधारतील. ई-वाहन चार्जिंग हब बीड जिल्हा ई-वाहन वापरासाठी पुढारलेला ठरेल. या प्रकल्पांमुळे बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल आणि जनतेच्या जीवनमानात मोठा फरक पडेल, असा विश्वासही खा.बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, खा.सोनवणे हे सर्वांगिन विकासासाठी प्रयत्न करत असून केंद्रीय मंत्र्यांकडे ते बीड जिल्ह्यातील विविध प्रश्न सातत्याने मांडत आहेत. खा.सोनवणे यांनी अनेक मंत्र्यांच्या भेटी घेवून बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवलेला आहे.
००
सभागृहातही खा.सोनवणेंचाच आवाज
खा.बजरंग सोनवणे हे ग्राऊंड पातळीवरून आलेले नेतृत्व आहे. यामुळे ग्रामीण भागात काय आवश्यक आहे, याची जाणीव त्यांना आहे. विशेष म्हणजे, याच कारणाने ते दिल्लीतील सभागृहात बीडसह मराठवाड्याचे देखील प्रश्न मांडत असतात. यामुळे संसदेत महाराष्ट्रातून सर्वाकि प्रश्न मांडणारे खासदार म्हणून सोनवणे यांच्याकडे पाहिले जात आहे.