सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघाचे 5 मे रोजी प्रथम वर्धापनदिन आयोजन
"सह्याद्री भुषण पुरस्कार - 2025" ने होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
विशेष प्रतिनिधी
दि.4 महाराष्ट्र राज्य पातळीवर पत्रकारांच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी तसेच पत्रकारांचे एकत्र वैचारिक संघटन या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संघाचा प्रथम वर्धापनदिन दि. 5 मे 2025 रोजी केज येथे आयोजित करण्यात आलेला असून यात संघाच्या कामकाजवर तसेच भविष्यातील उपक्रमावर प्रकाश टाकला जाणार असुन यात संघाच्या पुढील ध्येयधोरणांची रुपरेषा ठरवण्यात येणार आहे तसेच आजपर्यंत सामाजिक, शैक्षणिक , कृषी , राजकीय , औद्योगिक , आरोग्य सह विविध क्षेत्रात सकारात्मक विचार घेऊन काम करणारा संघ म्हणून सह्याद्रीचे नाव घेतले जाते. याच वैचारिक मंथनातून प्रथम वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना “सह्याद्री भुषण पुरस्कार 2025 ” ने गौरविण्यात येणार असुन सदरील पुरस्कार सोहळ्यास सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र कार्याध्यक्ष , तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हा अध्यक्ष , जिल्हा सचिव , तालुका अध्यक्ष, तालुका सचिव , तालुका कार्याध्यक्ष , तालुका संघटक , तालुका उपाध्यक्ष , तालुका कोषाध्यक्ष , व संघातील सर्व पदाधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत व यशस्वी आयोजनातुन सह्याद्री मराठी पत्रकार संघाचा प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज तालुका अध्यक्ष , सचिव उपाध्यक्ष , कार्याध्यक्ष , संघटक व सर्व संचालक व कार्यकारिणी यांच्या नियोजनातून सदरील सोहळा संपन्न होणार आहे.