केज शहरात गुरुकृपा योगा अकॅडमीचा शुभारंभ

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज/प्रतिनिधी
केज शहरामध्ये कानडी रोड येथे गुरुकृपा योगा अकॅडमीचा शुभारंभ दि.15-07-2025 मंगळवार रोजी रामकृष्ण परमहंस परिवाराच्या गुरुमाई खंदारे आईंच्या हस्ते करण्यात आला.या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. उत्रेश्वर जाधव सर होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून दिपा काटे,सपना शर्मा,उमा वळसे या उपस्थित होत्या.गुरुकृपा योगा अकॅडमीच्या संचालिका सुवर्णा शेटे यांनी प.पू. खंदारे गुरुजीं पासून प्रेरणा घेऊन योगाभ्यासाचे अध्ययन केले. संचालिकांनी प्रास्ताविकात सांगितले की,सध्याच्या धावपळीच्या जीवन शैलीत महिला पुरुष व बालकांचे आरोग्य,मनस्वास्थ अस्थिर झालेले आहे.प्रत्येकाला स्वतःचे जीवन सुस्थिर करण्यासाठी योग साधना खुप महत्वाची आहे.योग साधने द्वारे प्रत्येकाने स्वतः सह कुटुंबाच्या आयुष्यात आमुलाग्र बदल होतात. असे प्रतिपादन केले.याप्रसंगी प्रमुख पाहुण्या दिपा काटे यांनी मनोगत व्यक्त केले.तर अध्यक्षीय समारोप उत्रेश्वर जाधव सरांनी केला. यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.