दिव्यांग, जेष्ठांना मिळणार कृत्रिम साहित्य; शिबीराचा लाभ घ्या
खा.बजरंग सोनवणे यांचे आवाहन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज: बीड जिल्ह्यामध्ये दिव्यांगांना व जेष्ठ नागरीकांना मोफत कृत्रिम साहित्य साधने वाटप करण्याच्या अनुषंगाने दि.१८ ते ३०जुलै २०२५ या कालावधीमध्ये पूर्व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबीरात दिव्यांग, जेष्ठांनी लाभ घ्यावा, असे अवाहन बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
शिबीरामध्ये दिव्यांगांना जयपुरी फुट, कृत्रिम हात, कॅलीपर, व्हिलचेअर, ट्रायसिकल, क्रचेस, वॉकींग स्टीक, ब्रेल किट, स्मार्ट फोन, श्रवणयंत्र या सह जेष्ठ नागरीका करीता बेल्ट, वॉकर, काठया, चष्मे, कृत्रिम दात, खुबड, कृत्रिम अवयव, कानाची मशिन, व्हिलचेअर कमोडसहीत, सिलीकॉन खोम तकीया, नीब्रेस, स्पायनल सपोर्ट, सरवायकल कॉलर या सह इतर साहित्य वाटपाच्या अनुषंगाने पुर्व तपासणी शिबीर त्या-त्या तालुक्यातील पंचायतसमिती मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील केज येथे सदर शिबीराचे उद्घाटन दि.१८ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता खा.बजरंग सोनवणे, बीड लोकसभा मतदार संघ यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तालुकास्तरावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिबीर असेल, अशी माहिती एस.एन.मेश्राम-जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी दिली आहे. दरम्यान, या शिबीरात साहित्याचा लाभ घ्यावा, असे अवाहन खा.बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
००
आवश्यक कागदपत्रे
दिव्याग: दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्ड, आधार कार्ड, वार्षीक उत्पन्नाचा दाखला/ रेशन कार्ड उत्पन्न दर्शविणारे मासिक २२५०० किंवा वार्षीक २७०००० च्या आत, व जेष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड, वार्षीक उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड उत्पन्न दर्शविणारे (मासिक १५००० किवा वार्षीक १८०००० च्या आत असावे. अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी, एस.एन.मेश्राम यांनी दिली आहे.
०००
शिबीराबाबत अधिक माहिती
तालुका दिनांक ठिकाण
केज १८ जुलै पंचायत समिती
अंबाजोगाई १९ जुलै पंचायत समिती
बीड २१ जुलै पंचायत समिती
माजलगाव २२ जुलै पंचायत समिती
पाटोदा २३ जुलै पंचायत समिती
वडवणी २४ जुलै पंचायत समिती
आष्टी २५ जुलै पंचायत समिती
धारूर २६ जुलै पंचायत समिती
परळी २८ जुलै पंचायत समिती
शिरूर २९ जुलै पंचायत समिती
गेवराई ३०जुलै पंचायत समिती