नवजीवन फौंडेशन आणि अस्तित्व महिला प्रतिष्ठान संचलित प्रेम आधार बाल संगोपन केंद्राचे ए.सी.पी मुंबई ज्योती ताई देसाई शिर्के यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
सामाजिक विशेष

समृद्ध महाराष्ट्राच्या….सर्वांगीण बातम्यांसाठी
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
============================================================
*नवजीवन फाउंडेशन आष्टीआणि अस्तित्व महिला प्रतिष्ठान पुणे या सामाजिक संस्था महाराष्ट्रात अनेक सामाजिक कार्य करीत आहेत.या संस्थेच्या माध्यमातून महिला,निराधार,मनोरुग्ण, विधवा तसेच वयोवृध्द लोकांची,आजारी व्यक्तींची मोफत सेवा केली जाते.त्याच माध्यमातून पुणे जिल्ह्यातील अनाथ , निराधार मुलांना तसेच शाळाबाह्य मुलांना शिक्षण घेता यावे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सदाशिव पेठ पुणे येथे प्रेम आधार बाल संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.या संगोपन केंद्राच्या माध्यमातून अनाथ,निराधार,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार,आदिवासी,भटके विमुक्त,गरीब,वंचित,दुर्लक्षित घटकातील मुलांना मोफत सांभाळ करून त्यांना मोफत शिक्षण दिले जाईल*
*या प्रेम आधार बाल संगोपन केंद्रास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत नाही सदरील केंद्र समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि मदतीतून चालवले जात आहे*
*या प्रेम आधार बाल संगोपन केंद्राचे उद्घाटन ज्योती ताई देसाई शिर्के ए.सी.पी.मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ह. भ.प.कैलास महाराज वरेकर,सुमती ताई सत्तिकर खेड, अँड.राठोड सर,अस्तित्व महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अपर्णा ताई दुबे सरनोत,संचालक प्रितम सरनोत,नवजीवन फाउंडेशन चे अध्यक्ष विकास म्हस्के मेजर,स्वरा ताई,भारत शेगर,मोहन सावंत,अनिल शिंदे, मनीषाताई शेगर ,अस्तित्व महिला प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी,सभासद आणि प्रेम आधार बाल संगोपन केंद्राचे कमचारी,विद्यार्थी उपस्थित होते.*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कुलकर्णी यांनी केले. शेवटी वर्षा मोझे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.*