जतीन शेख चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
शैक्षणिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्य सरकारकडून दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शासनातर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी उच्च गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. अभ्यासासाठी मर्यादित साधने असूनही या जतीनने अथक मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 ( पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती ) चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी या शाळेचा विद्यार्थी जतीन जाहेर शेख याने 300 पैकी 254गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे. त्याला श्री. कुलदीप जठार सर ,श्री. सागर संकपाळ सर व त्याचे आईवडील यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापिका सौ.अनुराधा शिंत्रे मॅडम यांची प्रेरणा मिळाली.