आपला जिल्हा
प्रा किरण पाटील यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन केली प्रचारास सुरुवात

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
परळी (प्रतिनिधी)
मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे भाजप व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे उमेदवार प्रा किरण नारायणराव पाटील यांनी परळी येथील गोपीनाथ गडावर जाऊन स्व गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली बीड जिल्ह्याच्या खा डॉ प्रीतमताई मुंडे,प्रवीण दादा घुगे ,माजी नगराध्यक्ष अशोक होके पाटील,भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत, यांच्या उपस्थितीत दर्शन घेतले.
स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने मला लढण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते असे मत पाटील पाटील यांनी व्यक्त केले. प्रचार दौरा दरम्यान सर्व शिक्षकांशी गाठीभेटी घेत प्रचार दौरा सुरू झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.