श्रीधरआप्पा शिनगारे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

निधन वार्ता..
केज (प्रतिनिधी)
केज तालुक्यातील आवसगाव येथील जेष्ठ व्यक्तिमत्त्व तथा आप्पा या नांवाने पंचक्रोशीत सुपरिचित असणारे मनमिळाऊ स्वभावाचे स्वाभिमानी व्यक्तीमत्व श्रीधरआप्पा शिनगारे पाटील यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
प्रदिप शिनगारे, डॉ.प्रशांत दादा शिनगारे व आवसगावचे सरपंच विश्वास शिनगारे यांचे ते वडील होत. श्रीधरराव गणपतराव शिनगारे पाटील वय 95 वर्षे यांचे मंगळवार, दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास वृध्दापकाळाने दुःखद निधन आंत्यविध मौजे आवसगाव येथील शेतात करण्यात आले. त्यांच्या निधनाची
वार्ता माहिती होताच उपस्थित सर्वांनी आप्पांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक दिलखुलास व शिनगारे परिवारातील स्वाभिमानी व्यक्तीमत्व हरपल्याची लोकभावना व्यक्त केली.
*सर्वांच्या मदतीसाठी धावणारे आप्पा काळाच्या पडद्याआड :*
सदैव गावातील सर्वांना आपलेसे वाटणारे व सतत भेटलेल्या प्रत्येक नागरिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करणारे, प्रसंगी मदतीला धावून जाणारे आप्पा आज आपल्यात राहिले नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. तर आप्पांनी आपल्या संपूर्ण हयातीत कधीच आपल्या स्वाभिमानी स्वभावाशी तडतोड केली नाही. अशा या आवसगावच्या जेष्ठ व्यक्तिमत्त्वास पंचक्रोशीतील नागरिकांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.