आयआयटीमध्ये प्रवेशास पात्र ठरलेल्या उस्मानाबादच्या ओंकार शिंदे चा सत्कार
शैक्षणिक विश्व

उस्मानाबाद (प्रतिनिधी)
जेईई (JEE Advance ) परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. सदरील परीक्षेत उस्मानाबाद येथील काकानगर, सांजा परिसरातील ओंकार हरिचंद्र शिंदे यांने ओबीसी कॅटेगिरी मधून देशातून ४५७ रँक ने उत्तीर्ण झाला.सदरील परीक्षेमध्ये आयआयटी प्रवेशास पात्र झाल्याबद्दल त्याचा सत्कार नुकताच मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव, मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम, बीडचे डी.जी तांदळे ,उस्मानाबाद जिल्हा सचिव विक्रम मयाचारी, जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने सर, उस्मानाबाद शहराध्यक्ष व्ही. एस पाटील सर, औताडे सर,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे, मुख्याध्यापक तथा हनुमान शिक्षक शिक्षकेत्तर पतसंस्था घारगावचे सचिव फुलचंद कदम, शिक्षक भारती शिक्षक संघटनेचे कळंब तालुकाध्यक्ष ज्योतीराम सोनके, ढोले सर, यांच्या हस्ते ओंकार हरिश्चंद्र शिंदे व पालकांचा घवघवीत यशाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी भगवानराव शिंदे, हरिश्चंद्र शिंदे, पांडुरंग शिंदे, बालाजी शिंदे, अर्चना शिंदे,अंकिता शिंदे उपस्थित होते.ओंकार चे माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या छत्रपती हायस्कूलमध्ये झालेले आहे. तो यापूर्वी पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये गुणवत्ता यादीत आलेला आहे. तसेच मॅथस नॅशनल ऑलंपियाड परीक्षेत त्याला गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. दहावीच्या परीक्षेतही 99.20 टक्के गुण मिळाले आहेत.JEE मेन्स परीक्षेमध्ये 99.32 टक्के गुण मिळाले आहेत. एमएचटिसीईटी परीक्षेत 99.69 टक्के गुण घेतलेले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांने अथक परिश्रमानंतर यश मिळवले त्याबद्दल त्याचे अभिनंदन आणि कौतुक परिसरा मधून होत आहे. ओंकार चे वडील छत्रपती हायस्कूल उस्मानाबाद येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.