परमेश्वराने जेवढी चावी दिली आहे तेवढेच आपले आयुष्य असते–ह.भ.प. राजेन महाराज भोसले
निमित्त- कै.शेषेराव मुळे यांची प्रथम पुण्यतिथी

केज ! प्रतिनिधी
केज तालुक्यातील सारणी (सां) येथील कै.शेषेराव भानुदास मुळे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त दि.९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. राजन महाराज भोसले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाही जो या पृथ्वीवर जन्म घेतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे . आपण जशी एखाद्या मानवनिर्मित वस्तूला चावी देतो , जोपर्यंत ती चावी दिलेली असते तोपर्यंतच ती वस्तू पुढे चालते चावी संपली की ती वस्तू चालणे बंद होते . तोच प्रकार देवाने जोपर्यंत आपल्याला चावी दिली असते तोपर्यंतच आपले आयुष्य पुढे चालत असते . मनुष्य जन्म दोन प्रकारच्या कीर्ती असतात एक उत्तम कीर्ती तर दुसरी अपकीर्ती हे सांगत असताना आपल्या तपस्येच्या बळावर कैलास पर्वतालाही लका-लका हलवणारा आणि सोन्याची लंका असणाऱ्या बुद्धिमान , चाणक्ष , हुशार राजा रावण सुध्दा एका चुकीच्या वर्तणुकीने चंद्र-सुर्य असेपर्यंत त्याची अपकीर्तीच म्हणूनच त्याच्या कीर्तीकडे पाहिले जाईल . मनुष्य देहाला एकूण नऊ प्रकारचे बोळं असून सुद्धा एकाही बोळातून बाहेर येणारा द्रव्य हा सुगंधित नाही . त्यासाठी आपले जीवन सुगंधित करून कीर्तीरुपी अमर रहावे यासह आपल्या जीवनातील अनेक अमुल्य मूल्यावर ह.भ.प. राजेन महाराज भोसले यांनी अगदी साध्या आणि सरळ भाषेत प्रबोधन केले . यावेळी गणेश महाराज मुंढे , नारायण महाराज सिरसट , केज पं.स.चे मा. सभापती दत्तोबा भांगे , बाबासाहेब घोळवे , डॉ.जीवन ढाकणे , प्रा.शंकर ढाकणे , उद्योजक इंद्रभान मुळे , महादेव निंबाळकर , शंकर मुळे , रवींद्र देशमुख , भरत गिरी , कृष्णदास टाक , पत्रकार दिनकर जाधव , सुरेश घोळवे , अशोक भांगे यांच्यासह गावातील नागरिक तसेच पाहुणे , आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .