येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा केला जाहीर
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र देऊन आरक्षण देण्याची केली मागणी

केज (प्रतिनिधी)-
येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षणास आणि मनोज जरागे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांना देऊन आपली भूमिका जाहीर केली आहे.
यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की मराठा समाज हा महाराष्ट्रातील मुख्य घटक आहे. मराठा समाजाचे महाराष्ट्राच्या
सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण योगदान आहे. मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेती असून ९९ टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे.
मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तसेच आरक्षण नसल्यामुळे गरीब मराठा कुटुंबातील मुले शैक्षणिक व नौकरीच्या सुविधांपासून वंचित आहेत. याचा परिणाम मराठा कुटुंबातील आत्महत्यांचे प्रमाण मागील काही काळात वाढले आहे. तसेच मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी मी पहिल्यापासूनच आग्रही आहे. मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी मी विविध माध्यमातून सक्रीय राहिलो आहे व यापुढेही राहणार आहे.
सध्या मी कोणत्याही राजकीय पदावर नाहिये. तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत मी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा देतो व मराठा समाजास त्वरीत आरक्षण द्यावे अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.