राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त सम्राट अशोक मा. विद्यालय गोटेगाव येथे विविध शालेय स्पर्धांचे आयोजन यशस्वी संपन्न
निबंध लेखन , भाषण , रांगोळी व वेशभूषा स्पर्धेत 5 वी ते10 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी नोंदवला विशेष सहभाग
सांस्कृतिक वैभव
केज प्रतिनिधी
दिनांक 12 /1/2023 रोजी केज तालुक्यातील सम्राट अशोक माध्यमिक विद्यालय गोटेगाव येथील शिक्षण संस्थेच्या वतीने 12 जानेवारी रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध शालेय कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शालेय स्पर्धांचा आयोजन करण्यात येते याहीवर्षी जयंतीनिमित्त प्रथम प्रतिमा पूजन करून अभिवादन शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले व त्यांनतर शालेय विद्यार्थी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यात प्रथम जिजाऊ माँ साहेब , छत्रपती शिवाजी महाराज , मावळा , या वेशभूषांची विद्यार्थी स्पर्धा घेण्यात आली यावेळी मुलांनी हुबेहूब पोशाख परिधान करून वेशभूषेने शाळेतील वातावरण आकर्षक झाले होते तसेच रांगोळी स्पर्धेत शालेय मुलींनी विशेष सहभाग घेतला या दोन्ही स्पर्धेचे परीक्षण श्रीमती साखरे मॅडम , श्रीमती चौधरी मॅडम , यांनी पाहिले यानंतर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांना खालील विषय देण्यात आले होते यात आदर्श प्रेरणा राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी निबंध स्पर्धा घेण्यात आली यावेळी शाळेतील जवळपास सर्वच मुलांनी सहभाग घेतला होता सदरील स्पर्धेचे परीक्षण शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री खरबड सर , श्री केदार सर , श्री शिनगारे सर यांनी यशस्वीपणे पार पाडले तर भाषण स्पर्धेची सुरुवात शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती साखरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जेष्ठ पत्रकार श्री मनोराम पवार तसेच शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री खरबड सर , श्री सांवत सर , श्रीमती गायकवाड मॅडम , श्री पवार सर , श्री केदार सर , श्रीमती चौधरी मॅडम , श्री शिनगारे सर , श्री कदम सर शिक्षकेत्तर कर्मचारी श्री बचुटे,श्री निरडे यांच्या उपस्थितीत भाषण स्पर्धेचे उद्घाटन झाले व यावेळी आपल्या अमोघ वाणीतून शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी विशेष विचार व्यक्त करुन उपस्थितांची मने जिंकली. तर शाळेची 10वीतील विद्यार्थिनी कु .मोरे समिक्षा हि यशस्वीपणे सुत्रसंचलन केले व सम्राट अशोक माध्यमिक विद्यालय गोटेगाव येथे विविध शालेय स्पर्धा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी संपन्न झाल्या.