आवसगाव शिवरातील पिकांची झाली दयनीय अवस्था शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज
शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देण्याची गरज

कृषी विशेष केज ग्रामीण
———————————-
शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देण्याची गरज .
केज प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे आवसगाव शिवारातील सोयाबीन पिकांचे पावसाअभावी पिके करपून जात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांनी दिवसरात्र काबाडकष्ट करून आपल्या शेतातील पिके जोमदार आणली होती परंतु भर पावसाळ्यात पावसाने उघडीप दिल्याने जिवंत पिके करपून जात जागच्या जागी संपत आहेत . पिकांची झालेली अवस्था हजारो शेतकऱ्यांना जमीनदोस्त करणारी आहे आशा वेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे आलेली परिस्थिती हाताबाहेर गेली असुन सोयाबीन पिकांसह शेतात असलेल्या सर्व पिकांना नुकसान भरपाई देण्याची गरज असुन शेतातील शेतकऱ्यांच्या पशुधनास चारा उपलब्ध करण्यासाठी जनावरांनाही जगविण्यासाठी मदत होणे नितांत गरजेचे झाले आहे.
पिकांची झालेली दयनीय अवस्था बघवत नसुन शेतकरी हातबल झाला असुन आशाप्रसंगी सरकारने कुठल्याही आटी व शर्ती जगाच्या पोशींद्यावर न लावता भरीव मदत करत चोहुबाजुने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असे मत मौजे आवसगाचे उपसरपंच श्री बळीराम साखरे व मौजे आवसगाव येथील उपस्थित शेतकरी बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करत मत मांडले आहे .