आवसगाव येथे वडीलांच्या पंच्याहत्तरीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना उद्योजक रविंद्र रामचंद्र साखरे यांनी केले स्कुल बॅगचे वाटप
जिल्हा परिषद शाळा आवसगाव येथे शाळेतील सर्व मुलांना बॅग देऊन आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविणारे भुमिपुत्र

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडीया
शैक्षणिक व सामाजिक विशेष
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज/ प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे आवसगाव येथे 15 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त साजरा होत असलेल्या स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून मौजे आवसगावचे भुमिपुत्र तथा पुणे येथे यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत असणारे श्री रविंद्र रामचंद्र साखरे यांनी आपल्या वडिलांच्या पंच्याहत्तरी निमित्त ज्या शाळेत स्वता शालेय शिक्षण घेतलेल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कुल बॅग देण्याचे ठरवले. आणि आपल्या वडिलांच्या वयाच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने मौजे आवसगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व मुलांना स्कूल बॅग देऊन शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी सरपंच असणारे श्री रामचंद्र भाऊ साखरे यांचे जुने सहकारी तसेच प्रदेशात इंजिनिअर म्हणून कार्यरत असणारे श्री विजय शिनगारे माजी उपसरपंच श्री हनुमंत शिनगारे , आवसगावचे सरपंच श्री विश्वास शिनगारे , उपसरपंच बळीराम साखरे , ग्रामसेवक पोटभरे सर , सर्व ग्रा.पं सदस्य , शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अंकुश साखरे , तंटामुक्ती अध्यक्ष परमेश्वर साखरेे ,माजी शिक्षण समिती अध्यक्ष श्रा राहुल साखरे , सेवा सोसायटी चेअरमन व्हा.चेअरमन संचालक तथा आजी माजी पदाधिकारी , माता भगिनी , विद्यार्थी व गावकरी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते .
आवसगावच्या याच शाळेत उद्योजक रविंद्र साखरे यांचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले असल्याने शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्परतेने धावणारे भुमिपुत्र म्हणुन त्यांचा विशेष नावलौकिक आहे .
श्री रविंद्र साखरे यांनी याआगोदरही शाळेतील मुलांना आरोग्यदायी शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळाले पाहिजे यासाठी RO चा प्लांट असो कि गावातील पुरातन काळापासून प्रसिद्ध असणाऱ्या हनुमान मंदीराचा जिर्णोद्धार असो तसेच समृद्ध गाव या मोहिमेत भरीव मदत देऊन पाणी फाऊंडेशन मध्ये आपले योगदान देणारे श्री रविंद्र साखरे यांचे कार्य गावाच्या विकासासाठी व उज्ज्वला भविष्यासाठी खुप प्रेरणादायी आहे .
याच आपल्या सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून आपल्या वडिलांच्या पंच्याहत्तरी निमित्त मुलाने राबिलेल्या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे याप्रसंगी शाळेच्या वतीने श्री रविंद्र साखरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला .मौजे आवसगाव येथील शाळेच्या परिसरात नयनरम्य वातावरणात शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भविष्याचा वेध घेण्यासाठी एक यशस्वी सामाजिक उपक्रम सर्वांच्या उपस्थित यशस्वीपणे पार पडला.