अण्णा भाऊ साठे यांचा विचार अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतो—–डॉ हनुमंत सौदागर
आनंदगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

केज /(प्रतिनिधी)
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार माणसाला अन्यायाविरुद्ध लढायला, बंड करायला शिकवतात असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते आनंदगाव येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ग्रा पं सदस्य मधुकर वैरागे,सरपंच गणेश राऊत,अशोक भोगजकर,
आदींची होती.
पुढे बोलताना म्हणाले की अण्णा भाऊंनी वास्तववादी साहित्यातून उभा केलेला नायक नेतृत्वशील आहे सामान्य माणसाचे दुःख साहित्यात मांडून संघर्ष उभा केला आहे. सामान्य माणसाला स्वाभिमानाचं जगणं जगता यावं यासाठी कामगारांचा लढा उभा करून त्यांनी योगदान दिले. त्यांचे साहित्य माणसाला जगण्याची प्रेरणा देते असे मत यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गंगाधर वैरागे,
समिती सदस्य ओमकार वैरागे, मयूर वैरागे, सिद्धार्थ वैरागे, निखिल वैरागे, रामेश्वर वैरागे, लखन वैरागे,तुषार पौळ , माउली वैरागे, नागेश्वर जाधव , बळीराम वैरागे, महावीर वैरागे, अनिकेत वैरागे, अशोक वैरागे, कृष्णा वैरागे ,उत्रेश्वर वैरागे,
ईश्वर वैरागे, नागेश वैरागे,सुभाष वैरागे आदींनी परिश्रम घेतले. प्रतिमपूजन ,मिरवणूक कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.