येडेश्वरी साखर कारखान्याचा मंगळवारी गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न होणार.
शेतकऱ्यांना चांगला भाव बजरंग सोनवणे देणार

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज /प्रतिनिधी
येडेश्वरी साखर कारखाना लि. आनंदगाव सारणी युनिट -1 तालुका केज जिल्हा बीड या साखर कारखान्याचा सन 2023 24 च्या 10 वा गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 ते 11 वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर ह.भ.प. श्री प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहणार असून बजरंग बप्पा सोनवणे चेअरमन येडेश्वरी साखर कारखाना लिमिटेड हे तसेच प्रमुख उपस्थिती ह. भ. प. श्री महादेव महाराज बोराडे तुकोबाराय पावन धाम औरंगपूर ह. भ. प.श्री. कृष्ण महाराज चव्हाण, श्री.विठ्ठल मंदिर त्रिंबक चाटे प्रमोटर येडेश्वरी साखर कारखाना लिमिटेड आनंदगाव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी शेतकरी, मुकादम, भागधारक परिसरातील नागरी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान श्री बजरंग बप्पा सोनवणे, श्री. बाळकृष्ण बापू भवर संचालक साखर कारखाना लिमिटेड व संचालक मंडळ सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले आहे.