राजकीय

वाढती महागाई, बेरोजगारी आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बीड जिल्हा काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन व निदर्शने

प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

बीड जिल्हा प्रतिनिधी

================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
वाढती महागाई, बेरोजगारी आणि केंद्रातील मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवार, दिनांक १२ जुलै रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन व निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत काॅंग्रेसकडून मोदी सरकारच्या अघोषित हुकूमशाहीचा धिक्कार आणि विरोध करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ऍड.दिपक राठोड, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष युवराज पाटील, शुभम बोराडे, विश्वजीत जाधव, विलास कदम, तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, शहराध्यक्ष असेफोद्दीन खतीब, पशुपतीनाथ दांगट, प्रवीणकुमार शेप, गणेश बजगुडे पाटील, नारायणराव होके, दत्ता कांबळे, अफरोज तांबोळी, अशोक देशमुख, किसान काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, शंभुराजे देशमुख,संजय काळे, बाळासाहेब जगताप, प्रविण देशमुख, महादेव गव्हाणे, अन्वरभाई कुरेशी, ॠषि सोमवंशी, किरण उबाळे, रणजित देशमुख, शेख वाजेदभाई, शिवाजी देशमुख, शेख अकबर आदींसह असंख्य कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन करू नये असे सांगून ही काॅंग्रेस कार्यकर्ते यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी काही काळ वाहतूक खोळंबली दरम्यान, पोलिसांनी रस्ता अडवून धरलेल्या काॅंग्रेस कार्यकर्त्यांना हटविण्याचा प्रयत्न देखील केला. पण, कार्यकर्ते आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी न ऐकल्यामुळे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप सरकार विरोधात करण्यात आलेल्या जोरदार घोषणाबाजीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व परीसर दणाणून गेला होता. याबाबत अधिक माहिती देताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशी दौरे करण्यात, तर राज्यातील भाजपचे नेते हे विरोधी सरकार पाडणे, विरोधी पक्ष फोडणे आणि सत्ता स्थापन करण्यातच व्यस्त आहेत. वाढती महागाई, बेरोजगारीच्या विरोधात युवक काँग्रेस संपूर्ण राज्यात आक्रमक आहे, बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे वतीने आज अंबाजोगाई येथे निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यापुढे ही अशीच आंदोलने करण्यात येतील. या प्रसंगी बोलताना बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, भाजपच्या केंद्रातील मोदी सरकारच्या काळात विद्यार्थी, युवक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, श्रमजीवी आणि कष्टकरी वर्ग भरडला जात आहे. गोरगरीब जनता भूकेकंगाल होत आहे. नोकरदारांच्या नोकऱ्या ही धोक्यात आहेत. देशातील महिला, मुली, अल्पसंख्यांक, आदिवासी बांधव असुरक्षित आहेत. आज सीमेवरील सैनिक ही अस्वस्थ झाले आहेत. नफ्यातील सरकारी कंपन्या विकून आरक्षण संपविले जात आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी मरगळ आलेली आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. वाढत्या बेरोजगारी व महागाईने तर कळसच गाठला आहे. भाजप सरकारला भारतातील गोरगरिबांचे काहीही देणे घेणे नाही. देशाचे नेते राहुलजी गांधी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सर्वस्तरांतून मिळणारा प्रतिसाद पाहून मोदी सरकार घाबरले आहे. हा देश मोदी व भाजपा सरकारने लादलेल्या अघोषित हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. यावेळी काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध करीत जोरदार घोषणा दिल्या. “बेरोजगारांना रोजगार मिळालच पाहिजे”, “चले जाव, चले जाव मोदी सरकार चले जाव”, “तब लढे थे गोरो से, अब लढेंगे चोरों से”, “भाजपा तेरी हुकूमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी” असे निषेधाचे, विरोधाचे फलक झळकावून काॅंग्रेसने जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध सेलचे, पदाधिकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.