राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या केज तालुकाध्यक्षपदी दिनकर जाधव यांची निवड
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड | प्रतिनिधी
केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथील रहिवासी असलेले तथा गेल्या दीड दशकाहून अधिक काळ पत्रकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत सामाजिक प्रश्न सरकार दरबारी मांडणारे पत्रकार दिनकर किसनराव जाधव यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या केज शाखेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्रांची जान असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या दीड दशकापासून त्यांच्या पत्रकारितेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक अधिक आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच अनेक सामाजिक प्रश्न त्यांनी शासन दरबारी मांडत त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या आदेशाने राज्य सचिव दत्तात्रय मुजमुले यांनी दिनकर किसनराव जाधव यांची केज तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.