इंजिनियर विष्णु श्रीराम गीते यांच्याकडून नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब मुलांना किराणा सामानाची मदत
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

आष्टी तालुका प्रतिनिधी
आष्टी तालुक्यात नवजीवन फाउंडेशन संचलित नवजीवन संगोपन केंद्र येथे अनाथ,निराधार,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार,आदिवासी,भटके विमुक्त,गरीब,वंचित,दुर्लक्षित घटकातील मुलांचा मोफत सांभाळ करून शिक्षण दिले जाते.
या नवजीवन संगोपन केंद्रास शासनाचे कसल्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत मिळत नाही सदरील केंद्र समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि मदतीतून चालवले जात आहे या अनाथ,निराधार मुलांना फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी.तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने दिघोळ तालुका जामखेड येथील रहिवासी आणि सध्या सिंगापूर येथील सावी कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत असलेले इंजिनियर विष्णु श्रीराम गीते साहेब यांनी दीपावलीनिमित्त अनावश्यक खर्च टाळून नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब,अनाथ निराधार मुलांना एक महिना पुरेल इतके किराणा सामानाची मदत करून सहकार्य केले.या सामाजिक उपक्रमाने त्यांनी आपली दिवाळी साजरी केली.त्यांच्या या महान कार्यास नवजीवन परिवाराच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा.त्यांच्या हातून अशीच प्रामाणिक सेवा घडावी. दिघोळ सारख्या ग्रामीण भागातून जिद्दीने उच्च शिक्षण घेऊन स्वताच्या पायावर उभे राहणे सोपे नाही.त्यासाठी प्रमनिक कष्ट आणि अभ्यास करूनच या गोष्टी साध्य करता येऊ शकतात.साहेबांच्या या कार्याला नवजीवन परिवाराच्या वतीने मनापासून शुभेच्छा.त्यांच्या आयुष्यात त्यांना वेगवेगळी यशाची शिखरे मिळो हीच भगवान बाबा चरणी प्रार्थना.आणि पुन्हा त्यांच्या कार्यास शतशा नमन. या प्रसंगी नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असणारे दत्ता अभिमान गीते साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नवजीवन संगोपन केंद्र संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी पाहुण्यांचा योग्य सन्मान करून मनापासून आभार मानले.