ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोल चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
अमोल चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाचे बीड जिल्ह्यातून स्वागत

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई विशेष
देशाचे ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्र पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अमोल चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर अमोल चव्हाण, उध्दवराव गाडेकर व सहकाऱ्यांचे बीड जिल्ह्यातून स्वागत होत आहे.
तालुक्यातील मौजे नांदगाव येथील सरपंच उद्धवराव गाडेकर आणि युवा नेते अमोल चव्हाण यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या सर्वांचे देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील, मार्गदर्शक तथा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव गित्ते, पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, बीड लोकसभेचे माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर या प्रमुख नेत्यांनी त्यांचे पक्षात सहर्ष स्वागत केले. यावेळी साहेबांसह उपस्थित मान्यवरांनी आम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा व आशिर्वाद दिले आहेत. असे चव्हाण यांनी सांगितले. तर आपल्या पक्ष प्रवेशानंतर बोलताना अमोल चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील सर्वपक्षीय राजकीय घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर असे लक्षात आले की, देशाचे ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्र पवार साहेबांना वयाच्या 84 व्या वर्षी राजकारणात एकाकी पाडण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. अशावेळी या फुटीर नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी म्हणून आम्ही पक्ष प्रवेश केला आहे. माझ्या राजकीय जीवनातील सर्व सोबती, सहकारी, मित्रांशी चर्चा केली. यावेळी सर्वांचेच एकमत झाले. की, आपण खा.पवार साहेबांना साथ देण्यासाठी सक्रिय योगदान दिले पाहिजे, काळाची गरज ओळखून आम्ही, साहेबांच्या साक्षीने व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला आहे. आगामी काळात पक्ष संघटना अधिक हात बळकट करण्यासाठी मी मिळेल ती जबाबदारी स्वीकारून पक्ष मजबुत करण्याचे काम सर्वांना सोबत घेऊन करणार आहे. आगामी काळात मार्गदर्शक तथा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव गित्ते, पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांच्या विचाराचे खासदार व आमदार निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेणार आहोत. या प्रसंगी माझा व सहकाऱ्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहकार्य केले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. असे युवा नेते अमोल चव्हाण म्हणाले.
*कोण आहेत अमोल चव्हाण :
अमोल चव्हाण यांनी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून अतिशय चांगले काम केले आहे. त्यांच्या आई या नांदगावच्या उपसरपंच आहेत. तसेच ते यशस्वी उद्योजक ही आहेत. त्यांचे सहकारी व ते मागील काही वर्षांपासून परळी व केज मतदारसंघात सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी शेतकर्यांच्या बाबतीत संवेदनशीलता जोपासत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन केले. या कुटुंबांना सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. पीक विमा लागू करून देण्यासाठी तसेच शासनस्तरावर विम्यासह विविध योजना, अनुदान, मदतीचा लाभ मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्या अनुषंगाने त्यांना शिक्षणासाठी वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले आहे. जेष्ठ नागरिकांना वृध्दापकाळ मानधन योजना, निराधारांना मदत योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा रास्ता रोको आंदोलन केले आहे. वेळोवेळी शासन व प्रशासनास निवेदने देऊन मागण्या मान्य करून घेतल्या आहेत, तसेच त्यांनी सामाजिक दायित्व निभावताना नांदगाव आणि परीसरातील सर्वसामान्य लोकांसाठी तसेच गावकऱ्यांसाठी शासकीय किंवा खाजगी दवाखाना असो नाही. तर पोलिस स्टेशन, महावितरण कंपनीकडून डी.पी.मिळविणे, शेतकरी पिक विमा, सोयाबीन अनुदान, अळीच्या प्रादुर्भावाचे अनुदान, निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान व त्याची भरपाई, मावेजा मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे वेळोवेळी दिलेल्या निवेदनातून मागण्या केलेल्या आहेत. गरजूंना विविध मूलभूत योजना पुरविण्यासाठी तसेच त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांच्याकडून पुढाकार घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्य व बहुजन घटकांना न्याय देण्यासाठी व जात-पात, साम-दाम-दंड-भेद या राजकारणाचा अंत करण्यासाठी ते प्रत्येक निवडणुकीत जनजागृती करतात, समाजातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब बहुजन वंचित जनतेला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार हा पक्ष कटिबद्ध आहे, याच विचाराने आज चव्हाण व त्यांचे सहकारी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. चव्हाण यांच्यासारख्या तरूणांमुळे ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढली आहे. एक कुशल संघटक व अभ्यासू नेतृत्व म्हणून अमोल चव्हाण हे समाजातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, सर्वसामान्य, वंचित व बहुजन घटकांना न्याय देतील असा विश्वास बीड जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
*▪️सर्वसामान्य जनता पवार साहेबांसोबत :*
बीड हा कायमच पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे. साहेबांनी नेहमीच जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, सर्वसामान्य, वंचित व बहुजन घटकांना न्याय दिले आहे, पुरोगामी विचार जोपासणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार हा पक्ष भारतीय लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी कटिबद्ध आहे, याच विचाराने आज आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत, प्रामाणिक जनताच आता फुटीर नेत्यांना घरी बसवणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने लढेल व जिंकेल. जिल्ह्यात विकासाचा मोठा अनुशेष आहे. कायम राजकारणात आम्हीच राहिले पाहिजे, असा काही लोकांचा मतप्रवाह बनला आहे. तो चुकीचा आहे. त्यामुळेच बहुजन समाज आज राजकारणातून हद्दपार होत चालला आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामान्य जनताच आता परिवर्तन करेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
*- अमोल चव्हाण (कार्यकर्ता राकाॅंपा – शरदचंद्र पवार)*