शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्यशिबिर इंदूरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न
देश गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय-ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज/प्रतिनिधी
बातमी संकलन (डॉ जावेद शेख)
तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली)येथील वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक व धार्मिक कायकर्माचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10 रक्तदान शिबीर,10 ते 1 दरम्यान मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले
या शिबिराचे उद्धाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व प्रथम शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यावेळी शाळेतील माजी विद्यार्थी शेख जाहेर रहेमान हे कोल्हापूर महानगरपालिका मध्ये शिक्षक आहेत.शेख जाहेर यांना या वर्षी तीन आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ अशोक थोरात यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. व शालिनीताई कराड यांचा मुलगा डॉ पार्थ कराड याच शाळेचा विध्यार्थी डॉक्टर झाल्यामुळे सत्कार करण्यात आला.
त्यानंतर डॉ.थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आपल्या जिल्ह्यात रक्तपेढी मध्ये रक्तसाठा कमी असल्यामुळे आपण जिल्हा रुग्णालयात रक्तदान भवन निर्माण करत आहोत असे म्हटले .आपण या शिबिराच्या माध्यमातून अठरा जणांनी रक्तदान केले ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे म्हटले आहे.या वेळी
जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ यांच्यासह डॉ बालासाहेब कराड ,डॉ अनंत मुळे, डॉ अमोल गीते ,डॉ गणेश देशमुख,, डॉ सुरेश ठोंबरे,डॉ रामप्रभु तिडके ,डॉ रोहन गायकवाड ,डॉ लक्ष्मण वारे,डॉ चंद्रकांत तोंडे,डॉ प्रतीक्षा बावरे ,डॉ गंगाराम डोंगरे ,पत्रकार दत्तात्रय देशमुख उपस्थित होते.
शनिवारी सांयकाळी 5 ते 7 या वेळेत ह. भ. प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी सांगितले की
देश हा गरिबांनी आणि शेतकऱ्यांनीच सांभाळालाय
या देशाच्या सीमेवर फक्त शेतकऱ्यांची पोरं लढतायत कोणत्याही राजकारण्यांची ,मोठं मोठ्या उद्योगपतींची, देश रक्षणासाठी सीमेवर लढत नाहीत.
समाजात शिक्षणमहर्षी शामराव गदळे व बाळूताई शामराव गदळे यांनी आपल्या मुलांना दिलेल्या संस्कारातून एक मुलगा शशिकांत दहिफळकर,मुलगी शालिनीताई डॉक्टर आणि शरद गदळे इंजिनियर बनवले परंतु इतकेच नव्हे तर त्यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांचा परिवार उभारला आहे. तसेच त्यानीं केलेल्या कार्यातून आज आपण पाहत आहोत की या पंचक्रोशीतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात येथून शिक्षण घेऊन गेलेली मुलं ही नोकऱ्यांला लागलेले आहेत.
पुढे इंदोरीकर महाराज यांनी म्हटले की अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ,ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान आहे.समाजात वावरत असताना कोणाचे ही गुलाम म्हणून जगू नका,गावातील गट तट सोडा ,आपले गाव ,धर्म पाळा. आपल्या गावातील शाळा मंदिर झाले पाहिजे.अशाप्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण करण्याचे आव्हान ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांनी केले.या वेळी कार्यक्रमाला पंचक्रोशीतील मोठया संख्येने नागरिक उपस्थितीत होते.
शेवटी गदळे परिवारातर्फ डोईफोडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.