डॉ उत्तम खोडसे यांचा युसुफवडगाव जि.प .गटातील असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न .

वैभवशाली महाराष्ट्र न्युज विशेष
बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड जिल्हा येथे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष व बीड जिल्हा निरिक्षक राजेंद्रजी घाग , जेष्ठ नेते खालेद पेंटर ,शिवसंग्राम बीड जिल्हा अध्यक्ष नारायण काशीद , भारतीय संग्राम परिषद जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कोलंगडे , महिला जिल्हा अध्यक्षा अॅड मनिषाताई कुपकर , युवक अध्यक्ष रामहारी मेटे , ऊसतोड संघटना प्रदेश अध्यक्ष बबन माने , जिल्हा उपाध्यक्ष किसन कदम , यांच्यासह केज तालुका अध्यक्ष नामदेव गायकवाड , केज तालुका युवक अध्यक्ष अमोल पोपळे , प्रमुख उपस्थितीत शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद आयोजित करण्यात आलेल्या व बीड जिल्ह्यातील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका , नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी बैठकीत नायगावचे भुमिपुत्र व युसुफवडगाव जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय सामाजिक, राजकीय, आरोग्य , कृषी , क्षेत्रात व सर्व समाज बांधवांना आपलेसे वाटणारे मा. श्री .डॉ उत्तम खोडसे यांचा युसुफवडगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावांतील कार्यकर्ते यांच्यासह जाहिर प्रवेश करण्यात आला असून येणाऱ्या काळात शिवसंग्रामचा सैनिक म्हणुन काम करणार असल्याचे डॉ उत्तम खोडसे यांच्या वतीने कार्यक्रम प्रसंगी जाहीर करण्यात आले . यावेळी अनेक गावातुन जेष्ठ नागरिक , युवक सहकारी यांची बहुसंख्य उपस्थित होती .