सुर्डी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न .
news

सुर्डी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
केज प्रतिनिधी
सविस्तर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी राजमुद्रा मेडिकल फौंडेशन सेवा भावी संस्था व, वंचित बहुजन युवा आघाडी च्या संयुक्त विद्यमाने सुर्डी ता केज जी बीड येथे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात चस्मे वाटप शिबीर आयोजित केले होतें.या शिबिराचा शुभारंभ वंचित बहुजन युवा आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष मा भगवंत अप्पा वायवसे व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा प्रवक्ता ज्ञानेश्वर गिरी,व नेत्र चिकित्सक अविनाश अघोर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन बचुटे व सम्यक विद्यार्थी आंदोलनचे अक्षय गोटेगावकर, बाळासाहेब पौळ,राहुल पवार, गोटेगावकर,वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी तालुका अध्यक्ष राजेश सरवदे,उपाध्यक्ष अविनाश मुंडे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे मनुन गावातील युवा कार्येकर्ते मा गणेश भिसे,राहुल ठोंबरे,सरपंच राहूल शेलार,सदष्य विशाल कुपकर हे होते या शिबिरात तब्बल 70 रुग्णांनी तपासणी केली या शिबिरासाठी वंचितचे युवा कार्येकर्ते मा अमरजीत ओव्हाळ,राजाभाऊ ओव्हाळ,निलेश साखरे,आकाश तांबारे,विकास तांबारे,रोहन ओव्हाळ,विजय सोनवणे, किरण शेलार,अभिजित ओव्हाळ,मच्छीन्द्र तांबारें,नामदेव ओव्हाळ,ओंकार गिरी,रोहित ओव्हाळ,रमेश कसबे यांनी शिबिरासाठी,मोलाचे सहकार्य केले