केज तालुक्यातील शेतकरी सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षणासाठी रवाना
गाव समृद्धीच्या दिशेने शेतकऱ्यांची वाटचाल सुरू

केज दि४(प्रतिनिधी)
सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा सुरू झाली आहे.तीन दिवशीय निवासी शिक्षण आर्वी येथील शांतिवन येथे होत आहे. केज तालुक्यातून शेतकऱ्यांची पहिली बॅच शुक्रवार रोजी शांतीवनकडे प्रशिक्षणासाठी रवाना झाली. प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देण्याकरिता केज पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी सविता शेप, पानी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे, जलमित्र डॉ हनुमंत सौदागर,ग्रामसेवक बी एन रोडगे आदींनी शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणासाठी आनंदगाव पैठण ,सावळेश्वर, पाथरा, चंदनसावरगाव, गोटेगाव, आवसगाव,लहुरी आधी गावातील शेतकरी प्रशिक्षणासाठी गेले आहेत यामध्ये पुरुष व महिलांचा सहभाग आहे. प्रशिक्षणासाठी सरपंच, ग्रा पं सदस्य यांनीही सहभाग नोंदवला आहे
शेतकऱ्यांनी तीन दिवसीय प्रशिक्षण घेऊन शेतीच्या माध्यमातून गाव समृद्ध करावे असे मत शुभेच्छा प्रसंगी सविता शेप यांनी व्यक्त केले.
——–चौकट—–
प्रशिक्षणात मिळालेली ज्ञानाची शिदोरी घेऊन गट शेतीच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी, शाश्वत विकासासाठी आपण सर्वजण पुढाकार घेत आहेत.
हे समृद्धीकडे जाणारे पहिले पाऊल आहे.
संतोष शिनगारे
पानी फाउंडेशन मराठवाडा समन्वयक
——––———-