अग्रीम पीकविमा द्या, रुमनं हातात घ्यायला भाग पाडू नका, सरकार अन पीकविमा कंपनीला शेतकऱ्यांचा इशारा
ढाकेफळ येथे महामार्गावर चक्काजाम आंदोलन, शेतकरी अन शेतकऱ्यांची पोरं आक्रमक

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क
केज दि २५( प्रतिनिधी)
केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पोरांनी “ना कोणता पक्ष,ना कोणी नेता,आता लढायच आपल्या हक्कासाठी” अस सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत केज तालुक्यातील मौजे.ढाकेफळ येथे केज-अंबाजोगाई रोडवर ढाकेफळ,कुंबेफळ,चंदनसावरगाव,बनकरंजा,भाटुंबा,जानेगाव,पिसेगाव,कळमअंबा,सारणी,आनंदगाव,सोनीजवळा,पैठण,पात्रा,सावळेश्वर,जवळबन,होळ,केकतसारणी,उंदरी,बोबडेवाडी,आवसगाव सह परीसरातील शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं हक्काचा अग्रीम पीकविमा ,नुकसान भरपाई,गोगलगायी मुळे झालेल्या भाजीपाला शेतीची नुकसान भरपाई व पिवळा मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या सोयाबीनची नुकसान भरपाई आणि पिकविमा सरकारने तात्काळ मंजुर करावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.
सरकारचा जाहीर निषेध करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली
या शेतकरी आंदोलनाचे शेतकऱ्याच पोरं म्हणुन अरविंद थोरात यांनी नियोजन केले तसेच हे आंदोलनात अरविंद थोरात,स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कुलदिपजी करपे,छावाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे,कुंबेफळचे सरपंच किशोर तात्या,पैठणचे सरपंच ऋस्तुम चौधरी,पत्रकार डॉ हनुमंत सौदागर, मनोराम पवार,युवानेतृत्व महेश तपसे, पत्रकार सचिन साखरे,शाम चटप पाटिल,ओमकेश नेहरकर,अशोक थोरात ,विष्णू थोरात,किशोर थोरात,संदीप थोरात,रामेश्वर गायकवाड,संदिप पाटील,धनराज थोरात,प्रदिप थोरात,गणेश घाडगे,राहुल पाटिल,मयुर थोरात,विजय थोरात या शेतकऱ्यांनी व शेतकरी पुत्रांनी प्रतिनिधीत्व केले.या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरच होती.या आंदोलनाच्या माध्यमातून आज शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोर आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरली होती. यावेळी भावना व्यक्त करत असताना अग्रीम पिक विमा तात्काळ द्या अन्यथा पिक विमा कंपनी आणि सरकारला शेतकऱ्यांची पोर ताळ्यावर आणतील असा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला
रुग्णवाहिकेला तत्काळ रस्ता सोडला
रास्ता रोको सुरू असताना रुग्णवाहिका आली आणि आंदोलन कर्ते शेतकरी आपोआप बाजूला झाले तात्काळ रस्ता रिकामा करून दिला