मनोज जरांगे पाटील यांची छावा बीड जिल्हा प्रमुख शिवाजी ठोंबरे यांनी घेतली छ.संभाजीनगर येथे भेट
बीड जिल्हा केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथे होणाऱ्या मराठा आरक्षण महासभेस मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगिण बातम्यांसाठी
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज तालुका प्रतिनिधी
छ.संभाजीनगर येथे गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेले मराठा आरक्षण लढ्याचे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची छावा मराठा संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांनी भेट घेऊन आरोग्यविषयक विचारपूस करत मराठा आरक्षण जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपली तब्येत व आरोग्य सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आवश्यक असुन आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे भेटी प्रसंगी सांगितले यावेळी सोबत छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास भाऊ पांगरकर, छावा जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे ,अतुल भैया पांगरकर भद्रे पाटील लक्ष्मीकांत ठोंबरे गौरव देशमुख अभी ठोंबरे सह मराठा समाज बांधव होते . यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत छावा मराठा संघटनेचे बीड अध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांनी चर्चा करताना सांगितले की
मराठा आरक्षणासाठी 42 समाज बांधवांनी बलिदान दिलं होतं त्यांच्यासाठी सव्वा महिना आंदोलन चालून ठेवुन चार कोटी वीस लाख रुपयांची वाटप केली होती प्रत्येकी दहा लाख रुपये देत कुटुंबाला आधार देण्याचे कार्य आपण केले .
केज तालुक्यातील बोरी सावरगाव येथे बारा डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेची चर्चा झाली आजारी असतानाही तितकंच उत्साहाने बोलणं आणि कठोर शब्दांमध्ये बोलणं आजही कायमच आहे २४ डिसेंबरला तारीख संपणार असुन आरक्षण मिळवून देणारच हा शब्द त्यांच्या कायम मुखातून निघतो कोणत्याही जातीबद्दल वाईट शब्द वापरू नका कुठल्याही जाती धर्माला त्रास होणार नाही याची काळजी घ्या सगळे आपल्या सोबतच आहेत केज मतदार संघातील सर्व मराठा बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करत आरक्षण आपल्या हक्काचा आहे आणि ते मिळणारच आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही तेही 50% च्या आतलं कुणबी मराठा म्हणून अशी माहिती छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली.