वाशिम येथे २ डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन
हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा - जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांचे आवाहन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वाटाणे लॉन, अकोला नाका, वाशिम येथे भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. तरी वर्धापन दिन सोहळ्यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड बीडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी केले आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना जिल्हाध्यक्ष ठोंबरे यांनी सांगितले की, संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करीत आहे. सर्व महामानवांचे विचार अंगिकारून सर्व समाज घटकांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी कटिबद्ध आहे. विचार आणि कृतीच्या माध्यमातून समाजप्रबोधन, समाजकारण आणि राजकारण करीत आहोत. आरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि जुनी पेन्शन यासाठी सातत्यपूर्ण लढा देणाऱ्या अशा लोकाभिमुख संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वाटाणे लॉन, अकोला नाका, वाशिम येथे भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड.मनोज दादा आखरे हे असून यावेळी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती आणि मुख्य प्रवक्ते प्रा.गंगाधर बनबरे यांची मुख्य वक्ते म्हणून उपस्थिती असणार आहे. या राज्यस्तरीय वर्धापन दिन मेळाव्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी, सदस्य, संभाजी ब्रिगेडचे सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष उपस्थित राहणार असुन राज्यभरातून पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे, संतोष शिंदे, प्रदेश संघटक डॉ.बालाजी जाधव, शशिकांत कान्हेरे, अतुल गायकवाड, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमा बोके, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष संजीवनी बाजड, विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांच्यासह अनेक मान्यवर विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे निमंत्रक संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर तर स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पुरण लालचंद बदलाणी हे आहेत. संभाजी ब्रिगेड वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त कार्यकर्ता मेळावा ही आयोजित करण्यात आला आहे. तसेच हा सोहळा भव्य स्वरूपात साजरा होत आहे. तरी आपल्या बीड जिल्ह्यातील सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. अशी विनंती व आवाहन संभाजी ब्रिगेड बीडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी केले आहे.