जगाला टाटा करून भारताचे रत्न निखळले!
भारत देशाला जगात स्वंयपुर्णतेकडे घेऊन जाणारे प्रेरणादायी वैभवशाली व्यक्तीमत्व रतनजी टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय विशेष / देश विदेश
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष प्रतिनिधी
टाटा समूहाला जगात नावलौकिक मिळवून देणारे रतन टाटा यांचे निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी टाटा यांनी जगाचा निरोप घेतला.
१९३७ मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे व्यवस्थापन कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत जेथे त्यांनी १९७५ मध्ये शिक्षण पूर्ण केले.[३] १९६१ मध्ये ते त्यांच्या कंपनीत रुजू झाले. तेव्हा ते टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर काम करायचे आणि १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर ते त्यांचे उत्तराधिकारी होते. त्यांनी टाटा टी मिळवून टेटली विकत घेतली, टाटा मोटर्स घेऊन जग्वार लँड रोव्हर विकत घेतली आणि टाटा स्टील घेऊन कोरस कंपनीचे अधिग्रहण केले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्री गटातील टाटा समूहाला जागतिक व्यवसायात रूपांतरित करण्याच्या प्रयत्न केला.
गेल्या काही दिवसापासून रतन टाटा यांची प्रकृती बिघडली होती, त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
माझा भारत देश सर्व क्षेत्रात संपन्न झाला पाहिजे हे स्वप्न सतत उरी बाळगून त्यांनी कार्य केले . लाखों भारतीयांना टाटा उद्योग समूहात हाताला काम देऊन अनेक कुटुंबांचे आधार बनले तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनेक कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत कटिबध्द राहिले .
आशा या महान देशभक्तास व आमच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वास वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडिया ग्रुपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली .