सिंगल युज प्लास्टिक मुक्त भारत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सृजन संस्थेचा राज्यस्तरीय उपक्रम

दि.२०(अहमदपूर प्रतिनिधी)
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सिंगल यून प्लास्टिक मुक्त भारत (प्लास्टिक बंदी) जनजागृतीसाठी ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेचे निकाल आँनलाईन यूटूबच्या माध्यमातून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोदजी मोरे यांच्या हस्ते घोषित करण्यात आला.
दैनंदिन जीवनात प्लास्टिक सर्व ठिकाणी वापरले जाते. प्लास्टिकपासून पर्यावरणाला धोका आहे. दरवर्षी संपूर्ण जगात इतके प्लास्टिक फेकून दिले जाते की हे सर्व प्लास्टिक गोळा केल्यास संपूर्ण पृथ्वीला चार वेळा चक्कर मारता येईल.
जगभरातील प्लास्टिकच्या पिशव्या समाप्त करण्यासाठी सुमारे एक हजार वर्षे लागतील.
प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे दरवर्षी सुमारे एक लाख प्राणी मरतात.असे तज्ञाचे मत आहे.
पुनर्वापरक्षम नसलेल्या प्लास्टिकचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करणं गरजेचं आहे
एकल-वापर प्लास्टिकची बहुतांश उत्पादनं वापरल्यानंतर काही मिनिटांच्या आत फेकली जातात.भारतामध्ये दररोज सुमारे २५,९४० टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्यापैकी सुमारे ४० टक्के कचरा जमवलाही जात नाही अथवा त्यावर पुनर्वापरासाठी प्रक्रियाही केली जात नाही. त्यातून पाण्याचं प्रदूषण होतं, गटारं तुंबतात, मातीची प्रत बिघडते. प्लास्टिक-प्रदूषण अतिशय व्यापक परिणाम होतात.प्लास्टिक मुक्त भारत जनजागृतीपर स्पर्धेस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संस्थेतर्फे आवाहन केले होते.
वरील चित्रकला स्पर्धेत ११६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला.लहान मुलांचे हे जनजागृतीपर बोलके चित्र खूपच कौतुकास्पद आहेत असे मत संस्थेचे सचिव महादेव खळुरे यांनी व्यक्त केले.
सदरील स्पर्धा निःशुल्क होती.या स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ई- सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदरील स्पर्धा दोन गटात होती.
मोठ्या गटातून प्रथम-कु.नंदिनी शंकर वानखेडे वाशिम,द्वितीय-कु. ऋतुजा सुधीर कोकणे लातूर,द्वितीय-कु.क्रांती देविदास वाघमारे लातूर,तृतीय-कु.तृप्ती रवींद्र बोरसे जळगाव, तृतीय-कु.वैष्णवी विनोद इखे जळगाव तर उत्तेजनार्थ कु.समीक्षा अशोक कांबळे पुणे, कु.मयुरी प्रशांत रामपुरे सोलापूर, साकीर संजू तडवी पालघर, कु.तृप्ती शिवाजी वानखेडे वाशिम, कु.वेदांती संतोष वाघ वाशिम यांनी क्रमांक पटकावला.तर लहान गटातून प्रथम-कु.सानवी विनय अनुभवने बोरिवली,द्वितीय-कु.स्वरा संतोष सोमपुरे नांदेड,तृतीय-आयुष विजय चव्हाण सातारा या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला आहे.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना आँनलाईन व्यासपीठ निर्माण करुन देण्यात आले.सदरील स्पर्धा ही आँनलाईन पद्धतीने राबविण्यात आली.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण खमितकर, सलिम आतार,बस्वेश्वर थोटे,अविनाश धडे,पद्मा कळसकर,मल्लिकार्जून खळुरे,नदीम सय्यद आदिचे सहकार्य लाभले.