आपला जिल्हाराजकीय

देश वाचवायचा असेल तर काँग्रेस पक्ष टिकला पाहिजे – जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

_माणसा - माणसाला जोडण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे - आदित्यदादा पाटील_

 

राडी येथे काँग्रेस पक्षाच्या शाखेची स्थापना
================
अंबाजोगाई (वार्ताहर)
देश वाचवायचा असेल तर काँग्रेस पक्ष टिकला पाहीजे म्हणून सर्वप्रथम काँग्रेस पक्षाला अधिकाधिक बळकट करा असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले. तर यावेळेस बोलताना “खासदार राहूलजी गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ याञेच्या माध्यमातून माणसा – माणसाला जोडण्याचे काम आज ही काँग्रेस पक्ष करीत आहे” असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदित्यदादा पाटील यांनी काढले. अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे शुक्रवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी काँग्रेस पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी फलकाचे अनावरण करण्यात आले.

अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे शुक्रवारी आयोजित शाखा स्थापना समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, देशाला वाचवायचे असेल तर पहिल्यांदा काँग्रेस पक्ष वाचला पाहिजे. कारण, काँग्रेस पक्ष वाचला तरच हा भारत देश वाचणार आहे. त्यामुळे देशाच्या संविधानाचे रक्षण होईल आणि लोकशाही टिकेल, सर्वसामान्य माणसाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदान केलेले अधिकार अबाधित राहतील, तेव्हा याच पद्धतीने विचार करून आता सर्वसामान्य माणसाने कॉंग्रेसकडे आपला पक्ष म्हणून पाहिले पाहिजे, काँग्रेस पक्ष सर्वधर्मसमभाव हा विचार जोपासणारा देशातील एकमेव पक्ष आहे. सर्व जाती-धर्म यांना विकासाच्या मुख्य प्रक्रियेत घेऊन जाणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस होय, गोरगरीब – श्रीमंत असा भेदभाव काँग्रेस पक्षात केला जात नाही. धर्म व जातिभेद काँग्रेसला मान्य नाही, सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन जाणारे वंचित घटक, अल्पसंख्यांक बांधव, शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, शेतमजूर व गोरगरीब यांचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष होय, तर उद्योगपती, श्रीमंत, धनदांडगे आणि कॉर्पोरेट क्षेत्राचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष होय असे सांगून जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाने नेहमीच गोरगरिबांच्या कल्याणासाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना राबवून देशातील ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना निराधारांना भक्कमपणे आधार देण्याचे काम केले आहे. सत्तेच्या काळात काँग्रेस पक्षाने विविध लोकहिताच्या योजना राबवून भारत हा देश जगात महासत्ता झाला पाहिजे या भूमिकेतून सातत्यपूर्ण काम केले आहे, नेहरू व गांधी परिवारातील देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी या देशासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान ही दिले आहे. याचा विसर भारतीय जनतेला कधी पडला नाही तसेच भविष्यात ही पडणार नाही, तरी पुढील काळात सर्वसामान्य माणसाने काँग्रेस पक्षाच्या मागे आपली ताकद उभी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी करून काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या खासदार श्रीमती सोनियाजी गांधी, खासदार राहुलजी गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंकाजी गांधी, महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, राष्ट्रीय नेत्या खासदार सौ.रजनीताई पाटील, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, माजी मंञी अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यात येत आहे असे सांगून यावेळेस त्यांनी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे व त्यांच्या तरूण सहकार्यांच्या माध्यमातून राडी व पंचक्रोशीत काँग्रेस पक्षाचे बळकटीकरण आणि होत असलेल्या संघटनात्मक कार्याचे कौतूक केले. तर यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदित्यदादा पाटील म्हणाले की, भारतीय युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले खासदार राहुल गांधी यांनी “भारत जोडो” यात्रा काढून हा देश एकसंघ झाला पाहिजे, मनामनातून जोडला गेला पाहिजे, हा मौलिक संदेश घेवून भारतीय लोकशाही, संविधान याला धोक्यात आणू पहाणा-या मोदी – शहा यांच्या निरंकुश, एकाधिकार शाही लादू पाहणाऱ्या, भारतात अराजकता माजवू पाहणाऱ्या तसेच भारतीय जनतेला आर्थिकदृष्ट्या कंगाल, भारतीय तरूणांना बेरोजगार आणि शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेला कमकुवत करू पाहणाऱ्या भाजपाच्या प्रतिगामी सत्तेविरूद्ध खासदार राहुल गांधी यांनी “भारत जोडो” यात्रा काढून व्यापक लढा उभारला आहे. “भारत जोडो” यात्रेच्या माध्यमातून भारतातील माणूस जोडण्याचा मौलिक संदेश दिला आहे, मोदींच्या आठ वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाने देशामध्ये माणसा – माणसांत देशामध्ये जातीय व धार्मिक फूट पाडून त्यांना आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्याचे धोरण अवलंबून आज शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, गोरगरीब यांना विकासाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला करण्याचे काम केले आहे. त्यात देशाची मोठ्या प्रमाणावर अधोगती, पिछेहाट झाली आहे. महागाई आणि बेरोजगारी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतीय जनता पक्ष हा फक्त “इव्हेंट मॅनेजमेंट” करणारा पक्ष आहे, त्यामुळे माणसा – माणसाला जोडण्याचे काम करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मागे आता देशातील सर्वसामान्य जनतेने उभे रहावे, आगामी काळात गावागावात पोहोचून काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे आदित्यदादा पाटील म्हणाले. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदित्यदादा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, पशुपतीनाथ दांगट, बाळासाहेब ठोंबरे, कबिरोद्दिन इनामदार, दलिल इनामदार, समीर देशपांडे, अरूण गुंड, पञकार संतोष सोनवणे, दिनकर राऊत या मान्यवरांसह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धनराज कोळगिरे, भास्कर गंगणे, सतिश भगत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक नाना पाटील, राडीचे अध्यक्ष पिंटू नाना गंगणे, उपाध्यक्ष सत्तार शेख, सदस्य ऋषिकेश गंगणे, गजानन गंगणे, नय्युम शेख, महेबूब बागवान, प्रविण गंगणे, सुरज वाघमारे, भरत कोळगिरे, सतीश वाघमारे, पाशाभई शेख, माणिक जाधव, विठ्ठल जाधव, विठ्ठल काशिद, राम गंगणे, शेख नूर, धनराज काशिद, धारोबा बनसोडे, ईश्वर गायकवाड, सादेक पठाण, आश्रुबा वाघमारे, अनंत जाधव, दस्तगीर बागवान, गोकुळ वाघ, लक्ष्मण गंगणे, सादेक बागवान, नानासाहेब गंगणे, संदीपान गंगणे, बाळू पांचाळ , शिवराज राऊत, कल्याण दोडके, दादाराव बनसोडे, आदम सय्यद, अखिल शेख, पथरू सय्यद, राहुल वाघमारे, अज्जू बागवान, बाबन पठाण, एजाज पठाण, अलिम पठाण, रफिक सय्यद, मन्मत कोळगिरे, मधुकर गंगणे, राजाभाऊ गंगणे, विकास गंगणे, शिवाजी गंगणे, मुक्तार शेख, ज्ञानेश्वर गंगणे, नामदेव गंगणे, जनार्दन गंगणे, उस्मान बागवान, पप्पू बागवान, सय्यद भाई, विलास वाघमारे, तुळशीराम गंगणे, बाशुमियाँ पठाण, श्रीकांत डांगे, बलभीम गंगणे, किसन गंगणे, दत्तात्रय नागराळे, मोहन गंगणे, दत्तात्रय मुळे, अशोक गंगणे, सिद्धेश्वर कोळगिरे आदींसह इतरांची उपस्थिती होती. पविञ हज यात्रा करून परत आलेल्या जिब्राइल शेख यांचाही या वेळेस सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धनराज कोळगिरे, आश्रुबा कसपटे, बळीराम वाघमारे, नितीन वाघमारे आदींसह काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ गंगणे यांनी तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे यांनी मानले. या कार्यक्रमास राडी व पंचक्रोशीतील काँग्रेस पक्षाची विचारधारा मानणारे नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.