शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या मागणीला यश ,जिल्हा प्रशासनाचे आभार :- राजेंद्र आमटे
लम्पी लासिकरणासाठी बीड साठी 1 लाख लस उपलब्ध

बीड (प्रतिनिधि) शेतकऱ्यांचं पशुधन प्रशासनाने वाचवण्यासाठी तात्काळ उपाय योजना करून लम्पी रोगावरील लसीकरण इतर उपाय योजना राबिण्यासाठी शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी राऊत साहेब यांना जनावराच्या लम्पी रोगावरील लसीकरनचे नियोजन करून लसीकरण वाढवण्यात यावे या करिता मागणी केली होती. जिल्हाधिकारी शार्मा साहेब व उपजल्हाधिकारी राऊत साहेब यांनी शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या मागणीची दखल घेत तात्काळ यंत्रणा राबवत लसीकरण मोहीम गती दिली व बीड जिल्हा साठी 1लाख लसी उपलब्ध केल्या बद्दल जिल्हा प्रशासनाचे शिवसंग्राम शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, शिवसंग्राम सरचिटणीस सुहास पाटील, सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, जेष्ठ नेते योगेश शेळके, सरचिटणीस विनोद कवडे, युवा नेते सचिन बाप्पा कोठुळे, आनंद जाधव युवा नेते, शेतकरी तालुकाध्यक्ष अर्जुन सोनवणे , खाजाभाई पठाण,विजय डोके,सौरभ तांबे, फुलचंद सुरवसे,प्रकाश पिसाळ,दगडू गव्हाणे,अविनाश खांडेकर,अंगद माने आभार व्यक्त केले