
वैभवशाली महाराष्ट्र
केज : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ केज आणि केज तालुका व्यापारी महासंघ यांच्या सयूंक्त विद्यमाने केज शहर गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी रविवार दि 04 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्पर्धक परिवारास आपले प्रवेश आयोजकाकडे नोंदवता येतील असे आवाहन केज रोटरी व केज तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
केज रोटरीच्या वतीने दरवर्षी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षी केज तालुका व्यापारी महासंघाचा आयोजकामध्ये सहभाग असणार आहे. या स्पर्धेत गौरी मुखवटे व वेशभूषा, छत, समोर केलेला आरास, मांडणी, रोषणाई, पर्यावरण संदेश, सामाजिक संदेश व स्वच्छता इत्यादी मुद्यावर आधारित परीक्षण केले जाईल.
तरी केज शहरातील या स्पर्धेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या परिवारांनी आपली नांव नोंदणी रो पशुपतीनाथ दांगट (अध्यक्ष)- 7744017999
रो सूर्यकांत चवरे (सचिव)- 9860651023
रो हनुमंत भोसले (संस्थापक अध्यक्ष) 9423733888
रो प्रवीण देशपांडे-9420031555
रो महेश जाजू-9422741027
रो अरुण अंजान- 9325023790
रो. अरुण नगरे- 9422485732
रो श्रीराम शेटे- 9960012504
रो प्रकाश कामाजी-9860652454
रो. डी एस साखरे-09665249999
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी-9767802001 किंवा
सचिव सुहास चिद्रवार-7773988132 यापैकी कोणाही एका सदस्यांकडे दिलेल्या वेळेत नोंदणी करावी. उशिरा आलेल्या प्रवेशांचा विचार केला जाणार नाही. नोंदणी करताना आपला मोबाईल नंबर व परीक्षणासाठी आपली अनुकूल वेळ जरूर नमूद करावी. परीक्षक शक्यतो दिलेल्या वेळेत आपल्या घरी पोहोंचतील. मात्र अनेकांच्या वेळा एकच आल्यास आयोजक वेळ निश्चित करतील व आपणांस परीक्षक घरी येण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर पूर्वसूचना देतील.
तरी केज शहरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.