लोकनायक मा.आमदार स्व. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या धनेगाव कॅम्प येथे आस्थी दर्शन व शोकसभेचे आयोजन
अखेर मराठा आरक्षणासाठीच शेवटपर्यंत लढा , सर्वसामान्यांच्या आपल्या नेतृत्वाच्या अंतिम आस्थी दर्शनासाठी व शोकसभेस उपस्थित राहा - डॉ उत्तम खोडसे

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
लोकनायक मा. आमदार स्व. विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धनेगाव कॅम्प येथे आस्थी कलश दर्शन व शोकसभेचे आयोजन
मराठा आरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढा
केज प्रतिनिधी/ उद्या शनिवार दिनांक 20/8/22 रोजी ठिक दु. 3.30वाजता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे लोकनायक , मराठा आरक्षणाचे लढवय्ये क्रांतीसुर्य महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा आधारवड शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. स्व विनायकरावजी मेटे साहेब यांच्या आस्थी कलश दर्शन व शोकसभेचे आयोजन साईधाम हॉस्पिटल मौजे धनेगाव कॅम्प येथे करण्यात आले असुन यानिमित्ताने लोकनायक आमदार विनायकरावजी मेटे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ग्रामिण भागातील पंचक्रोशीतील शेतकरी बांधव , राजकीय , सामाजिक , सामाजिक संघटना , कृषी , आरोग्य , शैक्षणिक सह विविध क्षेत्रातील कार्यरत समाज बांधवांनी व आजी माजी शिवसंग्रामचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह केज तालुक्यातील ग्रामिण भागात असलेले समाज बांधव ज्यांनी आजपर्यंत अनेकवेळा स्व. मेटे साहेबांची लोकप्रियता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात खुप जवळुन पाहिले आहे या सर्व सहकारी यांनी लोकनायक आ. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या आस्थी कलश दर्शन व शोकसभेस उपस्थित राहाण्याचे आवाहन शिवसंग्रामचे पदाधिकारी डॉ उत्तम खोडसे व शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आले आहे .
माहितीसाठी संपर्क – डॉ उत्तम खोडसे (धनेगाव कॅम्प) मो. 9822981788