अर्थकारणआपला जिल्हासामाजिक

आधार मल्टीस्टेटकडून छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे व्याख्यान

मान्यवरांना पुरस्कार, गुणवंतांचा गुणगौरव

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

सामाजिक व आर्थिक विशेष

डिजिटल मिडिया न्यूज 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन व आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे व्याख्यान, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करणे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ गुरूवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ऍड.सुनील सौंदरमल यांनी दिली.

 

हा समारंभ गुरूवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता अंबाजोगाई येथे आधार मल्टीस्टेटच्या आधार भवन ‘अजिंठा हॉल’ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे माजी मराठी विभागप्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे ‘डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सणा प्रमाणे साजरी करा असे का म्हटले होते’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक तथा खोलेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे भूषविणार आहेत. या समारंभात समाजसेवा पुरस्कार – ऍड.संतोष पवार (आधार माणुसकीचा), उत्कृष्ट प्रशासन अधिकारी पुरस्कार – दीपक वजाळे (उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई), विद्याभूषण पुरस्कार – कार्डिओलॉजिस्ट डॉ‌.दीपक कटारे (अंबाजोगाई, लातूर) , उद्योगभूषण पुरस्कार – प्रकाश प्रताप मर्लेचा (संचालक, प्रेरणा ड्रेसेस, अंबाजोगाई) यांना तर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार – प्रा.डॉ.देविदास खोडेवाड (खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई) या मान्यवरांना जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण ही गुरूवार दिनांक २६ जुन रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे मराठी विभागप्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. अशी माहिती चेअरमन ऍड.सुनील सौंदरमल यांनी दिली. आधार मल्टीस्टेट ही सहकार क्षेत्रातील काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. ही केवळ अर्थ सेवा करीत नसून अर्थ क्षेत्रा बरोबरच समाजसेवेचे व्रत ही या संस्थेने अंगीकारले आहे. मागील १३ वर्षांपासून ही संस्था सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. आजपर्यंत आधार मल्टिस्टेटच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवळपास ४० मान्यवरांना सदरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच इयत्ता दहावी आणि बारावी तसेच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. मल्टिस्टेटच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महिलांचा सन्मान केला जातो. मकर संक्रांतीनिमित्त हाळदी – कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच होतकरू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सर्व महापुरूषांची जयंती तसेच शहरात नवीन आलेले अधिकारी यांचा सन्मान करणे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. याच सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून या वर्षी देखील गुरूवार, दिनांक २६ जून रोजी विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे ऍड.सुनील सौंदरमल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.