आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

क्रीडा शिक्षक प्रवीण उत्तमराव ठोंबरे व तातेबा काळे यांना राष्ट्रीय आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार जाहीर

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव.

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई प्रतिनिधी

 

 

अंबाजोगाई शहरात मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे तथा ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना घडवून त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे आमचे मित्र संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा क्रीडा शिक्षक प्रवीण ठोंबरे व तातेबा काळे यांना क्रीडा संस्कृती फाउंडेशन, नाशिकच्या वतीने सन २०२५ च्या राष्ट्रीय आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यातील कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, अंबाजोगाई येथील क्रीडा शिक्षक प्रवीण ठोंबरे सर व दत्त माध्यमिक विद्यालय सोमनाथ बोरगाव क्रीडा शिक्षक तातेबा काळे सर यांची निवड झाली आहे.या दोघांनी ही क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवत तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची निवड झाली आहे.

 

येत्या दिनांक २२ जून २०२५ रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यांच्या या निवडीबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.