गंगामाउली शुगर हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून चालनारा कारखाना – अविनाश आदनाक

केज प्रतिनिधी
गंगामाउली शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, अशोकनगर केज या कारखान्यामार्फत कारखाना आपल्या दारी शेतकरी ऊस परिसंवाद/ ऊस विकास कार्यक्रम मौजे – बोरगांव(आढाला). ता. केज येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री. अविनाश आदनाक साहेब यांनी कारखान्याचे व्यवस्थापन विषयी माहिती दिली व कारखाना चालवण्या विषयी मार्गदर्शन केले. हा कारखाना सर्व सामान्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन चालणारा कारखाना आहे, व कुठलाही पक्षपात न करता फक्त ऊसाची जात लक्षात घेऊन तोडणी प्रोगम प्रमाणे, आपल्या भागातील शेतकऱ्यांची ऊस तोडणी केली जाईल, व येत्या हंगामात उचांकी गाळप गंगा माऊली कारखान्या मार्फत केले जाईल अशी हमी दिली.
या सोबात गंगामाउली शुगरचे ऊस पुरवठा अधिकारी श्री. अनिल हिरे व ऊस विकास अधिकारी श्री. किरण सावंत यांनी आगामी गाळप हंगामात ऊस लागवडीची माहिती दिली यामधे हंगामनिहाय जातीची निवड, खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. सोबतच कारखान्याच्या मार्फत उसाच्या जातीची माहित, देऊन 10001 या जातीचे क्षेत्र वाढवण्यासाठी आव्हान करण्यात आले. या वेळी गावचे सरपंच,उपसरपंच, कारखान्याचे कृषि सहाय्यक गणेश घोळवे, श्रीकांत गायकवाड सोबतच गावातील प्रतिष्ठित मंडळी व ऊस उत्पादक शेतकरी व ईतर गावकरी कार्यक्रमास हजर होते.