अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी शिवसंग्रामचे निवेदन

बीड जिल्हा प्रतिनिधी
स्व.आ. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन शिवसंग्रामच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काल पाहणी केली असता पिकांची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे निदर्शनास येत आहे.त्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांना मा. श्री राधाबिनोद शर्माजी, जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत शिवसंग्रामच्या वतीने आज निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरआप्पा कोलंगडे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीद, युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैय्या मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, बीड तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख आबेद भाई, बीड तालुका सचिव शेख कुतुब भाई, मांजरसुंभा पंचायत समिती गणप्रमुख सचिन काळकुटे, ज्येष्ठ अल्पसंख्यांक नेते अखिलभाई, युवा नेते मनोज जाधव, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, शहर सचिव गोपीनाथ देशपांडे, शिवसंग्राम नेते ज्ञानेश्वर कोकाटे, सचिन बप्पा काेटुळे, योगेश नाना शेळके, हनुमंत पवार, सतीराम ढोले, शेख लालाभाई, राजू येडे हे उपस्थित होते.