युसुफवडगाव येथील ऊस-सोयाबीन परिषदेस शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे-कुलदिप करपे
सोमवारी सायंकाळी ७ वाजता राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत होणार परिषद

माळेगाव/प्रतिनिधी
:शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी शेती प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे सोमवारी (दि ३१) रोजी सायंकाळी ७ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या ऊस-सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषदेस पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे.
कुलदीप करपे यांनी दि २७,२८ रोजी केज तालुक्यातील सुर्डी सोनेसांगवी, माळेगाव, सुकळी,युसुफवडगाव,सावळेश्वर, पैठण,या गावी भेटी देऊन कॉर्नर बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.तसेच युसुफवडगाव, चिंचोली माळी,बनसारोळा,होळ या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित मराठवाड्यातील दुसऱ्या ऊस सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषदेत शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती करपे यांनी केली आहे.या शेतकरी परिषदेत मा.खा.राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे
*यावर्षीचा खरीप हंगाम अनेक संकटे घेऊन आला सुरुवातीला पावसाचा खंड नंतर ऐन काढणी वेळी पावसाचे थैमान घातल्याने सोयाबीनसह इतर पिके पूर्णतः वाया गेली त्यामुळे शेतकरी कोलमालडून पडला उध्वस्त झाला त्याच्या विविध प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे*
*या आहेत प्रमुख मागण्या*
*बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना यावर्षी पाहिली उचल २९०० रु देऊन सरासरी एफआरपी +३५० रु अंतिम दर द्यावा.
*साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करूनच गळीत हंगाम सुरू करा.
*अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रु नुकसान भरपाई विनाअट तात्काळ द्या
*सोयाबीन ला प्रति क्विंटल ८६०० रु दर द्या वायदेबाजारावरील बंदी उठवा
*सन २०२० चा पीकविमा तात्काळ वाटप करा तसेच २०२१ चा दुसऱ्या टप्प्यातील ७५% व २०२२ मध्ये ८०%पिकांचे नुकसान ग्राहय धरून पीकविमा मंजूर करून तात्काळ बॅंक खात्यात वर्ग करावा
*मांजरा धरणाच्या 0.५० मी.उंचीवाढी साठी अतिरिक्त संपादित क्षेत्र ९३.६९ हेक्टर जमिनीचा विलंब व्याजासह मावेजा तात्काळ द्या.