महाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिकसांस्कृतिक

डॉ उत्तम खोडसे मित्र परिवाराच्या दिपावली स्नेहमिलन सोहळ्यास दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे विभागीय सहनिबंधक ,व्याख्याते प्रदीप सोळुंके , पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे विशेष मार्गदर्शन संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्युज विशेष

केज /बीड प्रतिनिधी

केज तालुक्यातील धनेगाव कॅम्प येथे स्वराज्याचे लढवय्ये प्रेरणास्थान छत्रपती शिवराय व शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते आमदार विनायकरावजी मेटे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दिपावली स्नेहमिलन सोहळ्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सदरील कार्यक्रम नायगावचे भुमिपुत्र व मांजरा पट्ट्यातील सामाजिक , राजकीय कृषी , आरोग्य क्षेत्राशी व गोरगरीब जनतेला दिलासा देणारे विशेष व्यक्तीमत्व म्हणुन ज्यांचा आवर्जून नामोल्लेख केला जातो व ज्यांनी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमदार विनायकराव मेटे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन आपल्या हाती शिवसंग्रामाचे निशाण हाती घेऊन लोकनेते विनायकरावजी मेटे यांचा वसा आविरत सुरू ठेवणारे शिलेदार म्हणुन कार्य करत आहेत असे एक समाजाचा घटक म्हणून गोरगरीब जनतेसाठी अविरत आरोग्य सेवा देण्याचे महान कार्य सुरू ठेवणारे डॉ उत्तम खोडसे यांनी आयोजित केलेल्या दिपावली स्नेहमिलन सोहळ्यास महाराष्ट्रातील नामांकित व्यक्तीनी हजेरी लावल्याने जणू परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते सदरील दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शिका म्हणून शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या सुविद्य पत्नी तथा विभागीय सहनिबंधक लातुर मा. डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे या होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते श्री प्रदीप सोळुंके व प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलिस अधिकारी श्री सुर्यकांत कोकणे यांची विशेष उपस्थिती यावेळी होती.
शिवसंग्रामचे जेष्ठ नेते तथा भारतीय संग्राम परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कोलंगडे , शिवसंग्रामचे बीड जिल्हा अध्यक्ष नारायण काशिद , युवक अध्यक्ष रामहरी मेटे , जेष्ठ नेते अनिल घुमरे , जिल्हा सरचिटणीस सुनील आडसुळ , जिल्हा उपाध्यक्ष किसन कदम , आमदार विनायक मेटे यांचे मुजीब शेख सर अंबाजोगाई , छावा जिल्हा अध्यक्ष शिवाजी ठोंबरे , माजी तालुकाध्यक्ष लिंबराज वाघ , बाळासाहेब गलांडे , ऋषीकेश सुरवसे , आवारे पाटील , पत्रकार शुभम खाडे , शहर अध्यक्ष अशोक कदम महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा अॅड कुपकर , जिल्हा सरचिटणीस श्रीमती हंगे , महिला पदाधिकारी श्रीमती पटाईत , श्रीमती कोल्हे यांची तर जेष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब करपे , मराठा महासंघाचे छ.संभाजी नगर जिल्हाध्यक्ष अॅड सुधीर चौधरी , बप्पासाहेब डावकर , तालुका अध्यक्ष नामदेव गायकवाड , अ़बाजोगाई तालुका अध्यक्ष धनेश गोरे , अभिजित लोमटे , युवक तालुकाध्यक्ष अमोल पोफळे , शिवाजी वाघमारे , घोडके फौजी , अशोक कदम , कुरुंद तात्या , दिपक कोल्हे , डॉ शिंदे , सुमंत कदम , सहकारी अच्युत माने अंबाजोगाई , इत्यादीसह शिवसंग्राम परिवारातील महाराष्ट्रातील विविध भागांतील पदाधिकारी या़ची विशेष उपस्थिती होती तर केज तालुक्यातील झुंजार पत्रकार संघ , पुरोगामी पत्रकार संघ , संघर्ष पत्रकार संघतील पत्रकार बांधव यांची विशेष उपस्थिती होती तर आजी माजी सरपंच , उपसरपंच , चेअरमन व्हा. चेअरमन सदस्य व तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते तर मांजरा पट्ट्यातील सर्व गावातील नागरिकांनी विशेष हजेरी लावल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली यावेळी हजारो स्नेही मित्र यांच्या हजेरीमुळे कार्यक्रमाचे नवचैतन्य निर्माण झाले होते .

डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या गाड्यांच्या ताफ्याने अनेकांचे लक्ष वेधले

केज येथुन सुरू झालेला गाड्यांचा ताफा धनेगाव कॅम्पच्या दिशेने वाटचाल करत असताना 40 ते 50 गाड्यांच्या रांगा लागल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात पुन्हा नव्याने नवचैतन्य निर्माण झाले असुन यावेळी माळेगांव , सुर्डी , गोटेगाव , युसुफवडगाव , धनेगाव फाटा ,भालगाव , बावची , आनेगाव धनेगाव , नायगाव या गावातील पदाधिकारी यांनी डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे या़चे परिसरातील आगमनानिम्मति डॉ उत्तम खोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी सत्कार समारंभ करण्यात आला .व सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ उत्तम खोडसे मित्र परिवारातील शाम खोडसे , अक्षय खोडसे , ऋषी खोडसे , ज्ञानेश्वर खोडसे , भार्गव खोडसे , महेश गुजर , सोमनाथ गुजर , शिवराज थळकरी ,तेजस खरबड , शंभु लामतुरे , दिपक पोटभरे , दत्तात्रय मुजमुले , महेश खोडसे , राज खोडसे , लहु रुपदास , बबलु हांडीबाग , यश सोमवंशी , हर्षवर्धन खोडसे , भारत खोडसे ,काळु काळे श्री विजय कांबळे पैठण , यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रमचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष नामदेव गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन गोविंद शिनगारे यांनी केले व उपस्थिती सर्वांचे विशेष आभार मुख्य आयोजक डॉ उत्तम खोडसे यांनी मानले व सर्वांच्या उपस्थित दिपावली स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न झाला .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.