आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युज

भिवराज कोकणे यांची शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क विशेष

वडवणी :- (प्रतिनिधी)

मैत्रा फाउंडेशन तर्फे दिला जाणारा शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जि. प. प्रा. शाळा मोरेवाडी ता. वडवणी येथील सहशिक्षक भिवराज कोकणे यांना जाहीर झाला आहे. भिवराज कोकणे यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच शालेय, सहशालेय उपक्रम, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावणे, शाळेतील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा वापर करणे, ऑनलाईन शिक्षण, शिक्षकांच्या प्रशिक्षणात जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले आहे. त्यांच्या युट्युबवरील शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मैत्रा फाउंडेशन बीड यांनी त्यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे. १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभावन, बीड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. वडवणी तालुक्यातील मोरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे भिवराज कोकणे एक उपक्रमशील तसेच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून तालुक्यात लोकप्रिय आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द. ल. वारे, जिल्हाध्यक्ष संजय राठोड, वडवणी गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे, शिक्षण विस्तार अधिकारी बोराडे मॅडम, केंद्रप्रमुख जीवनराव मुंडे, मुख्याध्यापक दत्तात्रय कदम, शाळेचे मुख्याध्यापक सचिन डेंगे, प्रताप कांबळे, बापूसाहेब धनवे व वडवणी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातून भिवराज कोकणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.