आधार मल्टीस्टेटने केला पुरस्काराने गौरव ; गुणवंतांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे प्रबोधनपर व्याख्यान

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने गुरूवारी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करून आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात आले. या पार्श्वभूमीवर डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे प्रबोधनपर व्याख्यान, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
हा समारंभ गुरूवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता अंबाजोगाई येथे आधार मल्टीस्टेटच्या आधार भवन ‘अजिंठा हॉल’ मध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे माजी मराठी विभागप्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे ‘डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सणा प्रमाणे साजरी करा असे का म्हटले होते’ या विषयावर अतिशय उद्बोधक व्याख्यान दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक तथा खोलेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी भूषविले. या समारंभात समाजसेवा पुरस्कार – ऍड.संतोष पवार (आधार माणुसकीचा), उत्कृष्ट प्रशासन अधिकारी पुरस्कार – दीपक वजाळे (उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई), विद्याभूषण पुरस्कार – कार्डिओलॉजिस्ट डॉ.दीपक कटारे (अंबाजोगाई, लातूर) , उद्योगभूषण पुरस्कार – प्रकाश मर्लेचा (संचालक, प्रेरणा ड्रेसेस, अंबाजोगाई) यांना तर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार – प्रा.डॉ.देविदास खोडेवाड (खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई) या मान्यवरांना प्रदान करण्यात आले. गुरूवार रोजी आधार मल्टीस्टेट अंबाजोगाई शाखेच्या नवव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे विशेष उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. स्वागतगीतानंतर प्रास्ताविक प्रा.डी.जी धाकडे यांनी केले. तर आधारचे चेअरमन ऍड.सुनील सौंदरमल यांनी मल्टीस्टेटचे कामकाज कसे चालते याविषयीचे ‘प्रेझेंटेशन’ सर्वांसमोर मांडले. मान्यवरांच्या स्वागतानंतर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा विविध पुरस्कारांनी यथोचित सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह शाल, पुष्पहार आणि श्रीफळ असे होते. पुरस्कार प्राप्त ऍड.पवार व प्रा.डॉ.खोडेवाड यांनी समायोचित मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आधार मल्टीस्टेटकडून क्रांती विकास एडके (कला शाखा खोलेश्वर महाविद्यालय), गायत्री प्रवीण दहिवाळ (९१ टक्के), वाणिज्य शाखा आदित्य शिवराज गुजर (८१ टक्के), विज्ञान शाखा वैष्णवी चाटे (८० टक्के), संध्या मस्के, अभिजीत कल्याण मुळे (९१ टक्के), आकांक्षा दत्तात्रय नरवटे (८८ टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन कौतुक व अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर तब्बल दीड तास छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा संपूर्ण जीवनपट प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी उलगडला. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.कांबळे यांनी केला. यावेळी मुक्त पत्रकार व साहित्यिक अमर हबीब, डॉ.राहुल धाकडे, दगडू लोमटे, धनराज काळे, लंकेश वेडे, भरत पतंगे, प्रा.डॉ.बाळासाहेब मुंडे, प्रा.पंडित कराड, ऍड.बाबुराव तिडके, ऍड.दिलीप गोरे, ऍड.माणिक गोरे, राजेंद्र घोडके, धोंडीराम जोगदंड, गणपत व्यास, रामकिसन मस्के, माणिकराव बावणे, कचरूलाल सारडा, चंद्रशेखर वडमारे, इंजि.अभिमन्यू चव्हाण, इंजि.विजयानंद बलाढ्ये, डॉ.सुरेश शेळके परभणी, शाखाधिकारी रवी पंडित (परभणी), प्रा.शिवाजी मांदळे, मुख्याध्यापक उषाताई मांदळे, सौ.लक्ष्मीबाई भोसले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन आधार मल्टीस्टेटचे अधिकारी अशोक डोंगरे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.सुरेश शेळके (परभणी) यांनी करून दिला. आणि उपस्थितांचे आभार मुख्यकार्यकारी अधिकारी विजय राऊत यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.