ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
शैक्षणिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
नेकनूर /प्रतिनिधी
ग्रामीण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड .जगदीशरावजी शिंदे साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शेख फहिमोद्दीन ख्वाजा महीमोद्दीन ,व मिर्झा रहमततुला बेग , तसेच ज्ञानदिप कोचिंग क्लासेस चे संचालक श्री . तुळजीराम शिंदे हे उपस्थित होते . सुरुवातीस स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले . प्रास्ताविक करताना शाळेचे प्राचार्य पैठणे जे. एम .यांनी अभ्यासात सातत्य ठेवून यश संपादन करावे असे मत व्यक्त केले . व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी इ.10 वी च्या व 9वी च्या शेख अल्फीया जावेद , चिं काळे , कर्डुले सिद्धी व अनेक विद्यार्थ्यांनी शाळेविषयी व शिक्षकांविषयी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या . या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण प्रमुख पाहुणे शेख फईमुद्दीन ख्वाजा म हिमोददीन (माजी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन त्याचे महत्त्व विशद केले . यश हे जिद्द , चिकाटी ,आणि मेहनत याच्या जोरावर आपण यश संपादन करू शकतो असे यावेळी त्यांनी मत मांडले . विज्ञानाची कास प्रत्येकाने धरावी असे सांगितले . . कष्टाला कसलाच पर्याय नसल्याचे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले . स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही जीवनात निश्चित यशस्वी होऊ शकता असे मत त्यांनी व्यक्त केले . तसेच मार्च 2024 या बॅचमध्ये केंद्रातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपयाचे बक्षीस यावेळी जाहीर केले . आणि या 2023 24 बॅचमधील एम .बी .बी .एस . ला लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 51 हजार रुपयाचे बक्षीस त्यांनी यावेळी जाहीर केले . यामुळे सर्व विद्यार्थांमधे आनंदाचे वातावरण तयार झाले . यावेळी बहुसंख्य विद्यार्थी , श्री रुचके आर.के . श्रीमती कदम के. के . श्री वाघमारे एस . सी . श्री धन्वे एस एम. मंगेश रोटे व सर्व विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री मानमोडे एस.टी . यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हिवरेकर ए.के . यांनी केले .